घरपालघरम्हसरोळी गावात बनावट दारूचा साठा जप्त

म्हसरोळी गावात बनावट दारूचा साठा जप्त

Subscribe

सोमवारी सायंकाळी भरारी पथकाने कल्पेश बबन पाटील याच्या राहत्या घरात छापा टाकला असता त्याच्या घरात दमण बनावटीचा दारू साठा आढळून आला. यावेळी दमण बनावटीचे 24 बॉक्स आणि गोवा बनावटीचे नऊ बॉक्स मिळून 33 बॉक्समध्ये 305 बल्क लिटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

मनोर:  विक्रमगड तालुक्यातील म्हसरोळीत कल्पेश बबन पाटील याच्या राहत्या घरात दमण बनावटीच्या दारूचा साठा असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. सोमवारी सायंकाळी भरारी पथकाने कल्पेश बबन पाटील याच्या राहत्या घरात छापा टाकला असता त्याच्या घरात दमण बनावटीचा दारू साठा आढळून आला. यावेळी दमण बनावटीचे 24 बॉक्स आणि गोवा बनावटीचे नऊ बॉक्स मिळून 33 बॉक्समध्ये 305 बल्क लिटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. 2 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
म्हासरोळीला लागूनच असलेल्या गावात तीन दिवसापूर्वी मनोर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. यात गोवा बनावटी दारूचा मोठा साठा मनोहर पोलिसांनी हस्तगत केला होता आणि दुसर्‍याच दिवशी म्हसरोली गावात उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.

म्हसरोळी विभागात दारूचा अड्डा म्हणावा की काय असे लोकांकडून सांगण्यात येत आहे.
जप्त केलेला दारूसाठा कल्पेश बबन पाटील याने शासनाचा महसूल बुडवून विक्रीच्या उद्देशाने राहत्या घरामध्ये साठवणूक केल्याची भरारी पथकाच्या निरीक्षकांची खात्री झाल्याने त्याचा शोध घेण्यात आला. परंतु तो मिळून आला नाही, त्यामुळे आरोपी कल्पेश बबन पाटील याला फरार घोषित करण्यात आले आहे. आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ( E ) 90,98 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कदम, उप अधीक्षक बाबासाहेब भूतकर, भरारी पथकाचे निरीक्षक शंकर सीताराम आंबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, पथकातील अधिकारी जवानांनी केली
आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -