घरपालघरउष्माघात टाळण्यासाठी पालघर जिल्हा आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना

उष्माघात टाळण्यासाठी पालघर जिल्हा आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना

Subscribe

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी या दिवसांमध्ये पांढरे कपडे घालावेत. शक्यतो या दिवसांमध्ये काळे कपडे घालणे टाळावे.

पालघर: पालघर जिल्ह्यातील वातावरणात उन्हाचा कडाका वाढला असून रणरणत्या उन्हात अंगाची काहिली होऊन या काळात उष्माघाताचा त्रास सुरु होतो. या कडक उन्हापासून वाचण्यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी यांनी केले आहे. वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघात होतो. त्यावेळी त्या व्यक्तीला ताप येणे, डोळ्यांची आग होणे, खूप तहान लागणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, अतिघाम येणे, मळमळ, उलट्या, घबराट आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे, शरीरातील तापमान अचानक कमी होणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी लक्षणे दिसतात असे, डॉ. दयानंद सुर्यवंशी यांनी सांगितले.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी या दिवसांमध्ये पांढरे कपडे घालावेत. शक्यतो या दिवसांमध्ये काळे कपडे घालणे टाळावे. उन्हात बाहेर पडतांना डोक्यावर टोपी घालणे, स्कार्फ गुंडाळणे, काही नसल्यास निदान रुमाल डोक्यावर ठेवणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी या दिवसांमध्ये वारंवार पाणी पिणे इत्यादी गोष्टींची काळजी घेणे तसेच लिंबु सरबत, लस्सी, आवळा सरबत घ्यावे. उन्हातुन आल्यावर लगेच फ़्रिजचे पाणी शक्यतो टाळावे. उन्हात दुचाकीवरुन प्रवास करतांना डोक्यात हेल्मेट, टोपी आणि रुमाल बांधावा. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सनग्लासेसचा वापर करावा. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर पडतांना पाण्याची बाटली हमखास बरोबर ठेवावी, असे आवाहन डॉ. दयानंद सुर्यवंशी यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -