घरपालघरशिक्षकच नाहीत तर शाळांची गुणवत्ता कशी वाढणार?

शिक्षकच नाहीत तर शाळांची गुणवत्ता कशी वाढणार?

Subscribe

शासनाने शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो अजून कागदावरच आहे. त्यामुळे आहे त्या शिक्षकांवर अतिरिक्त भार पडणार आहे.

वाडा: वाडा पंचायत समितीत गटशिक्षण अधिकारी पदही प्रभारी सांभाळत असून विस्तार अधिकार्‍यांपासून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर, उपशिक्षक अशी शिक्षण विभागातील जवळपास सर्वच पदे रिक्त असल्याने याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होताना दिसत आहे. त्यामुळे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शासनाने शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो अजून कागदावरच आहे. त्यामुळे आहे त्या शिक्षकांवर अतिरिक्त भार पडणार आहे.

वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २९६ शाळा आहेत. त्यात १७३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येतही हळू हळू घट होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेवर ७१२ उपशिक्षक पदे मंजूर आहेत. यापैकी ६०३ पदे भरलेले आहेत तर १०९ पदे रिक्त आहेत. पदवीधर शिक्षकांची १७२ पदे मंजूर असून ६६ पदे भरलेली आहेत. तर ९६ पदे रिक्त आहेत.
मुख्याध्यापकांची ४१ पदे मंजूर असून ४ कार्यरत आहेत. तर ३७ पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांची २२ पदे मंजूर असून ५ कार्यरत असून १७ पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकार्‍यांची १० पदे मंजूर असून ५ कार्यरत तर ५ पदे रिक्त आहेत. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कार्यालयात २ पदे रिक्त आहेत. शालेय पोषण आहार अधीक्षक पदही रिक्त आहे.

- Advertisement -

शिक्षक भरतीची मागणी
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २९६ शाळांमध्ये १७३५० विद्यार्थी आहेत. विद्यार्थी संख्या पाहता तालुक्यात असलेला शिक्षक वर्ग हा अपुरा आहे. त्यामुळे शिकविण्याचा अतिभार हा असलेल्या शिक्षकांवर पडत आहे. शासनामार्फत शिक्षक भरती लवकर होणे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -