घरपालघरप्रवास कराल फुकट, तर दंड भराल दुप्पट

प्रवास कराल फुकट, तर दंड भराल दुप्पट

Subscribe

फुकट्या प्रवाशांकडून मागील काही महिन्यांमध्ये एसटीच्या अधिकार्‍यांनी हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जव्हार : जव्हार येथील नागरिकांना प्रवासाकरिता महामंडळाच्या एसटीवर अवलंबून राहावे लागते. सुरक्षित व कमी भाड्याचा प्रवास म्हणून नागरिकांची पहिली पसंती एसटीला आहे. परंतु हे असताना काही प्रवासी विना तिकीट प्रवास करून एसटीचे नुकसान करीत तर आहेत. त्यामुळे एसटीचे अधिकारी अशा फुकट्या प्रवाशांकडून दुप्पट भाडे घेत दंड देखील वसूल करीत आहेत. पालघर विभागातून गेल्या आठ महिन्यांपासून 179 विना तिकीट प्रवास करणार्‍या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करीत दहा हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून फुकटात प्रवास करणे अनेकांना महागात पडले असून मागील काही दिवसांमध्ये एसटीचे अधिकारी अशा फुकट्या प्रवाशांवर नजर ठेवून आहेत. फुकट्या प्रवाशांकडून मागील काही महिन्यांमध्ये एसटीच्या अधिकार्‍यांनी हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना संकट आणि कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. त्यातच फुकटे प्रवासी यात भर टाकत आहेत. मे, जून व जुलै महिन्यांमध्ये सर्वाधिक फुकटे प्रवासी आढळले आहेत. या प्रवाशांकडून एसटीने दुप्पट दंड आकारला. प्रवाशांवर वाहकांसह एसटी तपासणी अधिकार्‍यांची नजर असते. त्यामुळे फुकटात प्रवास कराल तर खबरदार, असे म्हणण्याची वेळ आली. पालघर विभागात जून तसेच जुलै महिन्यामध्ये तपासणीमध्ये सर्वाधिक फुकटे प्रवासी आढळून आले. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे उन्हाळ्याचा हंगाम गेला. त्यानंतर मात्र एसटीने अधिकाधिक सेवा देत कमाई सुरु केली आहे. एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संप काळामध्ये राज्य परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. दरम्यान, संप मिटल्यानंतर हळूहळू एसटी पूर्वपदावर आली. मात्र, फुकट्या प्रवाशांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यासाठी महामंडळाने आता तपासणी यंत्रणा कडक केली असून, कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

- Advertisement -

प्रवाशांनी आपली जबाबदारी म्हणून एसटीमध्ये तिकीट काढूनच प्रवास करावा. यामुळे एसटीचे नुकसान टळणार आहे. विशेषत: फुकट्या प्रवाशांची तपासणी नियमित केली जात आहे. ही कारवाई टाळण्यासाठी प्रथम तिकीट काढणे आवश्यक आहे.
– प्रशांत सटानेकर,
तिकीट तपासणी अधिकारी, पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -