घरपालघरनावझे गावात श्री आदिशक्ती स्थळांच्या इतिहासावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

नावझे गावात श्री आदिशक्ती स्थळांच्या इतिहासावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

Subscribe

पालघर जिल्ह्यातील नावझे गावातील युवा नवरात्र मंडळ अंतर्गत नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने श्री आदिशक्ती स्थळांच्या इतिहासावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.

वाणगाव : पालघर जिल्ह्यातील नावझे गावातील युवा नवरात्र मंडळ अंतर्गत नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने श्री आदिशक्ती स्थळांच्या इतिहासावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. पालघर जिल्ह्यातील श्री आदिशक्ती देवीच्या इतिहासावर स्थानिकांना मार्गदर्शन करण्यासाठी किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख व इतिहास अभ्यासक श्रीदत्त नंदकुमार राऊत उपस्थित होते. काल २९ सप्टेंबर रोजी रात्री ९.०० ते १२.०० या वेळेत झालेल्या या मार्गदर्शनपर व्याख्यानात राऊत यांनी पालघर जिल्ह्यातील गडकोट, निर्मळ मंदिर, जंजिरे वसई अर्नाळा देवी, पौराणिक कथा, पेशवेकालीन मोडी कागदपत्रे, श्री आदिशक्ती स्थळे, नावझे ग्राम संदर्भ, श्री महालक्ष्मी व आसावा गड, श्री वज्रेश्वरी देवी, नरवीर चिमाजी आप्पा, जंजिरे वसई किल्ला, गोंधळ परंपरा, ब्रिटिशकालीन चित्रे, जंजिरे अर्नाळा रेणुका मंदिर, महालक्ष्मी स्थाने इत्यादी शेकडो विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

श्रीदत्त राऊत यांनी आगामी नवीन संशोधनपर महालक्ष्मी (आशेरी गड), भवानीगड नवीन दैवते, तांदुळवाडी गड दैवते या विषयावर सविस्तर संवाद साधला. तर श्री आदिशक्तीच्या पालघर जिल्ह्यातील विविध मूर्ती, इतिहास, स्थळे, परंपरा, महती व्यक्त करणारा हा मार्गदर्शनपर उपक्रम समस्त भाविकांना व जिज्ञासू व्यक्तींना मार्गदर्शक ठरला यात शंका नाही. दुर्गसंवर्धन व दुर्गसंशोधन विषयावर जागृती करणे काळाची गरज आहे. असे मत किल्ले वसई मोहिम परिवाराचे दुर्गमित्र प्रतिनिधी प्रीतम पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिक पाटील यांनी केले. या उपक्रमात स्थानिक बालगोपाळ वर्ग आणि स्त्रियांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. व्याख्यान माध्यमातून दैवतांची मूळ कथा व मूर्ती याबाबत संवाद करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांनी व्याख्यान माध्यमातून देवींच्या विविध मूर्ती स्थापत्यशास्त्र विषयक माहिती स्लाइड शो माध्यमातून पाहिली. पालघर जिल्ह्यातील आदिशक्तीचे महत्व सविस्तरपणे मांडणारा हा उपक्रम सर्व ग्रामस्थांच्या पसंतीचा व मार्गदर्शक ठरला. मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, उल्हास पाटील, आशिष भोईर, संजय पाटील, आशितोष भोईर यांनी उपक्रम नियोजनात योगदान दिले. नावझे गावातील कै. बबन पाटील व कै. सौ बबीता पाटील यांच्या स्मृती स्मरणार्थ व्याख्यान अर्पण करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -