घरपालघरपोटनिवडणुकीत सर्वपक्षीय मैदानात; बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती

पोटनिवडणुकीत सर्वपक्षीय मैदानात; बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती

Subscribe

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी काही अपवाद वगळता सर्वच पक्षांनी मैदानात उडी घेत स्वतंत्र चुली मांडल्या आहेत.

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी काही अपवाद वगळता सर्वच पक्षांनी मैदानात उडी घेत स्वतंत्र चुली मांडल्या आहेत. त्यामुळे बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढती होणार असल्याचे अर्ज मागे घेण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवसानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी ७४ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० उमेदवार मैदानात उतरले आहेत. पोटनिवडणुकीत काँग्रेसने आधीच एकला चलो चा नारा दिला होता. त्यानुसार काँग्रेसने स्बवळावर मैदानात उतरली आहे. काही अपवाद जागांवर पक्षीय युती, आघाडी झाली आहे. पण, हा अपवाद वगळता बहुतेक जागांवर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, बहुजन विकास आघाडी यांचेही उमेदवार मैदानात उतरले असल्याने पोटनिवडणुकीत बहुरंगी लढत होणार आहे.

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, माकप, बविआ यांची सत्ता आहे. तर भाजपा विरोधात आहे. राज्यातही हीच स्थिती आहे. असे असले तरी पोटनिवडणुकीत मात्र हे सर्व पक्ष एकत्र येऊ शकलेले नाहीत. मोखाडयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. तसेच काही जागांवर राष्ट्रवादी-माकप यांनी हातमिळवणी केलेली आहे. तर वाड्यात मनसेने भाजपशी हातमिळवणी केलेली आहे. परिणामी पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांचे उमेदवार मैदानात उतरलेले दिसून आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, येत्या ५ ऑक्टोबरला निवडणुक होत असल्याने अवघ्या काही दिवसांचाच कालावधीच मिळाल्याने युती, आघाडीच्या चर्चा यशस्वी होण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात येते. महत्वाचे म्हणजे प्रत्येक तालुक्यात त्या-त्या पक्षांची समिकरणे वेगळी असल्याने युती,आघाडीचा प्रयोग सफल होण्यातही अडचणी आल्या आहेत.

निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या असताना अद्याप चिन्ह वाटप, मतदान पत्रिकेवरील क्रमवारी जाहिर होऊ न शकल्याने सर्वच उमेदवारांना आपापले चिन्ह मतदारांपर्यत पोचवणे जिकीरीचे होऊन बसणार आहे. याभागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढले असून मंगळवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. येथील मतदारसंघ दुर्गम भागात दूरवरपर्यंत विखुरले गेलेले असल्याने 5 ऑक्टोबरपर्यंत मतदारांपर्यंत पोचायचे कसे हाही प्रश्न उमेदवारांना चिंतेत टाकू लागला आहे. म्हणूनच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लगेचच प्रचाराला सुरुवात केली होती. वैयक्तिक गाठीभेटी, बैठका, गाव-पाड्यात प्रचार फेऱ्या काढण्यावर उमेदवार भर देताना दिसत आहेत.

- Advertisement -

वाड्यात भाजप-मनसेत एकत्र

पालघर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असून भाजप विरोधी पक्ष आहे. पोटनिवडणुकीत मात्र महाविकास आघाडी होऊ शकली नाही. तर भाजपने काँग्रेसच्याच धर्तीवर एकला चलोची भूमिका घेतलेली आहे. मात्र, वाडा तालुक्यातील पोटनिवडणुकीत भाजप-मनसे यांच्यात युती झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी वाडा येथील भाजप कार्यालयात ही घोषणा केली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हेही उपस्थित होते. कुणबी सेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता मनसेही भाजपसोबत आली आहे. जिपच्या पोटनिवडणुक होत असलेल्या १५ पैकी पाच जागा वाडा तालुक्यातील आहेत. त्यामुळे भाजप-मनसे-कुणबी सेनेच्या आघाडीला विशेष महत्व आले आहे.

हेही वाचा –

IPL किक्रेट सामन्यावर सट्टा, ठाण्यातून त्रिकुटाला अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -