IPL किक्रेट सामन्यावर सट्टा, ठाण्यातून त्रिकुटाला अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

IPL Betting Racket Busted In Thane three bookies arrested rs 7.45 lakh seized

आबुधाबी मध्ये सुरू असलेल्या “इंडीयन प्रिमियर क्रिकेट (IPL2021) मधील सनराईज हैद्राबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्रिकेट सामन्यावर अवैधरित्या बेटिंग (IPL Betting Racket Busted In Thane) करणाऱ्या संशयित आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. रितेश कुवरप्रकाश श्रीवास्तव (४४ ), कुणाल बबनराव दापोडकर (३३), निखील फुलचंद चौरसिया ( ३२) अशी या संशयित आरोपींची नावं आहेत. या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या कल्याण परिमंडळाने अटक केली. त्यांच्याकडून ७ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून ते तिघे बुकी ऑपरेटर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोढा, पलावा, कासारिओ गोल्ड, एफ विंग, २ माळयांवर, प्लॅट क्र. २०९ येथे काही जण हे बेकायदेशीर रित्या इंडीयन प्रिमियर लीगमधील सनराईज हैद्राबाद व राजस्थान रॉयल्स यांचेमधील क्रिकेट सामन्यावर अवैधरित्या बेटिंग (सटटा) घेत असल्याची माहिती २७ सप्टेंबरला सकाळी मिळाली होती, त्यानुसार पोलीस पथकाने छापा मारून निखील चौरोसिया याला ताब्यात घेतले. त्यावेळी यो मोबाईल, लॅपटॅप फोनवरून राजस्थान रॉयल्स विरुध्द सनराईज हैद्राबाद यांच्यातील आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा (जुगार/बेटींग) घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड असलेले ०६ मोबाईल व सिमकार्ड नसलेले एकुण १७ मोबाईल जप्त केले आहेत. दरम्यान बेटींग घेणाऱ्या रितेश श्रीवास्तव आणि कुणाल दापोडकर, या दोघांना मुददेमालासह ताब्यात घेत त्यांच्याविरोधात मुंबई जुगार कायदा कलम ४, ५, १२ (अ) तसेच भादविक ४२०, ४६८,३४,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वडणे, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय पाटील, पोलीस शिपाई ऋषीकेश भालेराव, पोलीस हवालदार देवरे,पोलीस नाईक लोखंडे, कुरणे, पोलीस शिपाई बडगुजर यांनी केली आहे.