घरपालघरपालघर येथे सार्वजनिक न्यास नोंदणीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

पालघर येथे सार्वजनिक न्यास नोंदणीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Subscribe

पालघर जिल्ह्यातील या लोकार्पण झालेल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात येतील व राज्याच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.

पालघर : पालघर येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग (दूरदृष्यप्रणालीद्वारे), धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पालघर येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण झाले असे जाहीर करतो. पालघर जिल्ह्यातील या लोकार्पण झालेल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात येतील व राज्याच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.

दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करताना ते म्हणाले की, पालघरसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कार्यरत झाले ही आनंदाची बाब आहे. पालघरचा इतिहास आपण सर्वांना माहीत आहे. पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर राज्यातच नाही तर संपूर्ण भारत देशात इतके भव्य जिल्हा मुख्यालय कुठेच पहायला मिळणार नाही, याबाबत मी सिडकोचे आभार व्यक्त करतो. आदिवासी जिल्हा बहुल जिल्हा असल्याने आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. जिल्ह्यात चांगले रस्ते, रोजगार, कारखाने निर्मिती, पर्यटन वाढीसाठी हे सरकार प्रयत्नशील असून पर्यावरणात समतोल राखणे ही काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीही जोर देण्यात येईल असे सांगितले.

- Advertisement -

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांनीही दूरदृष्यप्रणालीद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण प्रवासात असल्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, पालघरचे सहायक धर्मादाय आयुक्त दिनकर पाटील यांच्यासह विधी व न्याय विभागाचे अधिकारी, संघटनचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. पालघर येथील धर्मादाय कार्यालय २०१९ मध्ये दिवंगत अशोक चुरी यांच्या प्रयत्नाने सुरू झाले असून सुरुवातीला पालघर शहराच्या पूर्वेस भाडेतत्त्वावर कार्यालय सुरू झाले होते. आता इतके भव्य स्वतंत्र कार्यालय मिळाल्याने धर्मादाय कार्यालयाच्या वतीने राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचे आभार यावेळी राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -