घरपालघरती हत्या पत्नीनेच केली

ती हत्या पत्नीनेच केली

Subscribe

मित्र या दोघांना काल संध्याकाळी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच या दोघांनीही खुनाची कबुली दिल्याने या गुन्ह्याचा छडा लागला.

वाडा : तालुक्यातील जाळे येथील विलास गोरे (वय-५०)या इसमाची रविवार (दि.९)हत्या करण्यात आली होती. ही घटना भिवंडी तालुक्यातील देवचोले गावाच्या हद्दीत घडल्याने या गुन्ह्याची नोंद गणेशपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.पोलिसांची तपासाची चक्रे फिरताच संशयाची सुई मयताच्या पत्नीकडे वळू लागल्याने पोलिसांनी मयताची पत्नी व त्याचा मित्र या दोघांना काल संध्याकाळी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच या दोघांनीही खुनाची कबुली दिल्याने या गुन्ह्याचा छडा लागला.
दरम्यान, यातील आरोपी रामदास सोनावले (वय-४४),वैशाली गोरे(वय-४३)या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मयत विलास आणि आरोपी रामदास रा.अस्नोली ता.शहापूर यांचे दोघांचे मैत्रीचे संबंध असल्याने तो नेहमीच आरोपीच्या घरी येत होता. त्यातून आरोपीची पत्नी व त्याचे प्रेम संबंध जुळले या दोघांत तीच्या नवर्‍याची अडचण होत होती. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी या दोघांनी कट रचून हा खून केला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. ही कामगिरी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, गणेशपुरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र आगरकर,एल.सी.बी.चे सुरेश मनोरे, गणेशपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मराज सोनके व सहकार्‍यांसह घटना स्थळी मिळाल्याच्या पुराव्याच्या आधारे तपास करून बारा तासांच्या आत खुनाचा उलगडा केल्याने गणेशपुरी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -