घरपालघरJawhar News: काळ मांडवी डोहात बुडून वीस वर्षीय युवकाचा मृत्यू

Jawhar News: काळ मांडवी डोहात बुडून वीस वर्षीय युवकाचा मृत्यू

Subscribe

या ठिकाणी जाण्याचा रस्ता अतिशय जोखमीचा असून आजूबाजूला खोल दरी आणि पाण्याचे डोह आहेत.

जव्हार: जव्हारच्या काळ मांडवी धब धबा येथे फिरण्यासाठी नाशिक मधील सिडको परिसरातील सावता नगर येथील आठ युवक हे बुधवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आले होते. या ठिकाणी जाण्याचा रस्ता अतिशय जोखमीचा असून आजूबाजूला खोल दरी आणि पाण्याचे डोह आहेत. पाण्यात उतरताना खोलीचा अंदाज न आल्याने हर्षल जितेंद्र बागुल या वीस वर्षीय युवकाचा पाण्यात पडून मृत्यु झाला असल्याची माहिती जव्हार पोलीस ठाणे येथून देण्यात आली.मृतदेहाचे शव विच्छेदन जव्हार येथील उपजिल्हा रूग्णालयात करून नातेवाईकांच्या ताब्यात शव देण्यात आले असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -