घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : महाराष्ट्रात अजित पवारांना झटका?; महायुतीचे पारडे मात्र जड

Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात अजित पवारांना झटका?; महायुतीचे पारडे मात्र जड

Subscribe

Lok Sabha Election 2024 : एका सर्व्हेनुसार या निवडणुकीचा निकाल अजित पवार यांच्या पक्षासाठी धक्कादायक ठरू शकतो.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आता अवघ्या काही तासांवर आले आहे. निवडणुकीपूर्वी अनेक सर्व्हे समोर येत असतात. अशाच एका सर्व्हेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन वाढवले आहे. एक वृत्तवाहिनी आणि पीपल्स इनसाईट आणि पोलस्ट्रॅटने केलेल्या या सर्व्हेनुसार या निवडणुकीचा निकाल अजित पवार यांच्या पक्षासाठी धक्कादायक ठरू शकतो. (Lok Sabha Election 2024 ajit pawar can gets double blow in maharashtra survey says)

भाजपा राज्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरणार

पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच या सर्व्हेचे अंदाज समोर आले आहेत. या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 28 जागा या एनडीएला मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळू शकतात. तर राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि त्यांना 25 जागा मिळू शकतात. भाजपाचा मित्र पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिवसेनेला तीन जागा मिळू शकतील. मात्र, सध्याच्या सरकारमधील भाजपाचा तिसरा मित्रपक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील अजित पवार यांच्या पक्षाला मात्र या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला, महायुती आणि मविआतील नेत्यांची कसोटी लागणार

बारामतीचा निर्णय एकतर्फी लागणार?

पूर्वापार पवार कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बारामती मतदार संघावर यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या येथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या समोर राष्ट्रवादीतून बाहेर पडत पक्ष, चिन्ह आणि पक्षाचे नाव स्वतःकडे घेतलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. थोडक्यात, इथे नणंद आणि भावजय असा सामना रंगणार आहे. त्यामुळेच राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. या सर्व्हेनुसार, ही जागा सुप्रिया सुळे राखतील. हा अजित पवार यांच्यासाठी आणखी एक धक्का असू शकतो. (Lok Sabha Election 2024 ajit pawar can gets double blow in maharashtra survey says)

- Advertisement -

विरोधकांना किती जागा?

सर्व्हेच्या अंदाजानुसार, काँग्रेस, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्ष या तिघांच्या आघाडीला अर्थात महाविकास आघाडीला या निवडणुकीत 20 जागा मिळू शकतात. यात शिवसेना – उद्धव गटाला 10 जागा मिळण्याचा अंदाज असून तो सर्वात मोठा पक्ष असेल. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी – शरद पवार गट यांना 5 – 5 जागा मिळू शकतात. (Lok Sabha Election 2024 ajit pawar can gets double blow in maharashtra survey says)

हेही वाचा – Lok Sabha Election : शरद पवारही बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारी अर्ज दाखल करणार


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -