घरदेश-विदेशLok Sabha : पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावला, देशभरातील नेत्यांचे भविष्य मतपेटीत...

Lok Sabha : पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावला, देशभरातील नेत्यांचे भविष्य मतपेटीत होणार बंद

Subscribe

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांसह देशभरातील 102 जागांसाठी 19 तारखेला मतदान होणार आहे.

मुंबई : आरोप-प्रत्यारोप, टीकेचे जोरदार प्रहार, नेत्यांच्या सभा, पदयात्रा यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहचलेला प्रचार आज थंडावला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांसह देशभरातील 102 जागांसाठी 19 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी उमेदवारांना निवडणूक  प्रचार करता येत नाही. असे असले तरी प्रत्यक्ष प्रचार संपल्यानंतर उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भर छुप्या प्रचारावर असणार आहे. (Lok Sabha Election 2024: The first phase of the campaign has cooled down the future of leaders across the country will be locked in the ballot box)

पहिल्या टप्प्यात नागपूर, कन्याकुमारी, चेन्नई सेंट्रल, मुझफ्फरनगर, सहारनपूर, कैराना, पिलीभीत, दिब्रुगड, जोरहाट, जयपूर, छिंदवाडा, जमुई, बस्तर, नैनिताल, लक्षद्वीप आणि त्रिपुरा पश्चिम या महत्त्वाच्या जागांवर 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. प्रमुख चेहऱ्यांमध्ये भाजपाचे के. अन्नामलाई, द्रमुक उमेदवार कनिमोझी, केंद्रीय मंत्री किरीन रिजिजू, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ, जितिन प्रसाद, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी, अगाथा शर्मा, हनुमान बेनिवाल, चंद्रशेखर आझाद, अजय भट्ट आणि ए राजा आदींचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपा जिंकावी ही काँग्रेसचीच इच्छा आहे का?, काय म्हणाले गुलाम नबी आझाद 

मोदी, राहुल गांधीसह इतर नेत्यांकडून शेवटच्या दिवशीही जोरदार प्रचार (Heavy campaigning by Modi, Rahul Gandhi and other leaders on the last day as well)

पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. मोदींनी आज सकाळी आसाममधील नलबारी येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले आणि त्यानंतर दुपारी त्यांनी आगरतळा, त्रिपुरामध्ये जनतेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तर राहुल गांधी यांनी आज सकाळी गाझियाबादमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यानंतर ते आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी कर्नाटकात गेले. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी सहारनपूरमध्ये रोड शो केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुटला? निलेश राणेंचे सूचक वक्तव्य

21 मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान (Voting in 21 constituencies in the first phase)

 1. तामिळनाडू : चेन्नई सेंट्रल, श्रीपेरामबादूर, कांचीपुरम, अरक्कोनम, वेल्लोर, कृष्णगिरी, धर्मपुरी, तिरुवन्नमलाई, अरणी, विलुप्पुरम, कल्लाकुरिची, पोलाची, दिंडीगुल, करूर, तिरुचिरापल्ली, पेरांबलूर, कुड्डालोर, चिदंबरम, मायालादुथुराई, नागापट्टिनम, तंजावर, शिवगंगा, मदुराई, थेनी, विरुधुनगर, रामनाथपुरम, थुथुक्कुडी, तेनकासी, तिरुनेलवेली, कन्याकुमारी, तिरुवल्लूर, चेन्नई पूर्व, चेन्नई दक्षिण, सालेम, नमक्कल, इरोड, तिरुपूर, निलगिरी, कोइंबतूर
 2. उत्तर प्रदेश : मुरादाबाद, पिलीभीत, रामपूर, सहारनपूर, कैराना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना
 3. मध्य प्रदेश : मंडला, बालाघाट, छिंदवाडा, सिधी, शहडोल, जबलपूर
 4. राजस्थान : अलवर, भरतपूर, करौली-धोलपूर, दौसा, नागौर, गंगानगर, बिकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपूर ग्रामीण, जयपूर
 5. आसाम : काझीरंगा, सोनितपूर, तखीमपूर, दिब्रुगड, जोरहाट
 6. बिहार : औरंगाबाद, गया, नवादा, जमुई
 7. महाराष्ट्र : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर
 8. छत्तीसगड : बस्तर
 9. जम्मू आणि काश्मीर : उधमपूर
 10. अरुणाचल प्रदेश : अरुणाचल पश्चिम, अरुणाचल पूर्व
 11. मेघालय : शिलाँग, तुरा
 12. उत्तराखंड : टिहरी गढवाल, गढवाल, अल्मोडा, नैनिताल, उधम सिंग नगर, हरिद्वार
 13. पश्चिम बंगाल : कूचबिहार, अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी
 14. त्रिपुरा : त्रिपुरा पश्चिम
 15. मिझोराम
 16. पुद्दुचेरी
 17. सिक्कीम
 18. नागालँड
 19. अंदमान आणि निकोबार
 20. मणिपूर
 21. लक्षद्वीप

हेही वाचा – Dignity of Women : अजित पवारांनी घेतली नितीश कुमारांचीच चाल, महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -