घरपालघरMeat shops closed: मांसविक्री दुकाने रविवारी बंद राहणार

Meat shops closed: मांसविक्री दुकाने रविवारी बंद राहणार

Subscribe

त्यावेळी त्यांनी अहिंसेचा उपदेश केला होता. त्यामुळेच यादिवशी मांसविक्रीची दुकाने बंद ठेवून या दिवशीचे पावित्र्य राखले जाते.

वसईः रविवार, 21 एप्रिल रोजी महावीर जयंती असल्याने वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील चिकन, मटण, बिफ मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नगर विकास विभागाच्या 29 जून 2019 च्या शासन परिपत्रकानुसार, उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी तसे आदेश नऊही प्रभागांच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.जैनधर्मियांत भगवान महावीर यांना आदराचे आणि पूज्यस्थान आहे. त्यामुळे महावीर जयंती हा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. महावीर यांनी सत्याच्या शोधात आपले सिंहासन आणि कुटुंबाचा त्याग केला होता. त्यांनी १२ वर्षे तपस्वी म्हणून वनवास भोगला. त्यावेळी त्यांनी अहिंसेचा उपदेश केला होता. त्यामुळेच यादिवशी मांसविक्रीची दुकाने बंद ठेवून या दिवशीचे पावित्र्य राखले जाते.

दरम्यान, चिकन, मटण, बिफ मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तालय परिमंडळ-२ व ३ च्या पोलीस उपायुक्तांनाही करण्यात आल्या आहेत. वसई-विरार शहरात सातशेच्या आसपास मांसविक्रीची दुकाने आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -