घरमहाराष्ट्रनाशिकLok Sabha 2024 : स्वाभिमानी महाराष्ट्र विकत घेणे शक्य नाही; आदित्य ठाकरेंनी...

Lok Sabha 2024 : स्वाभिमानी महाराष्ट्र विकत घेणे शक्य नाही; आदित्य ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा

Subscribe

हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि तो तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भाजपाला दिला. 

नाशिक : महाविकास आघाडी शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला संबोधित करताना शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, उपस्थित गर्दी पाहून वाकचौरे यांच्या विजयाची खात्री झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान टिकवायचं असेल, महिलांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवाचे असतील तर मशालला मतदान करावं लागेल, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं. (Lok Sabha Election 2024 Self-respecting Maharashtra cannot be bought Aditya Thackeray BJP)

अहमदनगर येथील आयोजित सभेत संबोधित करताना मोदी सरकारच्या फसवणुकीच्या धोरणावर आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल सरकार आलं तेव्हा आपण कर्जमाफी ‌केली, ही ठाकरे गॅरंटी होती. मविआ सरकारने नुकसान भरपाई दिली, मात्र मोदी सरकारने शेतकऱ्यांवर ड्रोनद्वारे अश्रुधूराचा वापर केला. आज देशात नोकऱ्या निर्माण होत नाहीत. राज्यात अडीच वर्षात एक तरी उद्योग आला का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : नाशिकमधून छगन भुजबळांची माघार, हेमंत गोडसेंचा मार्ग मोकळा?

आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळे उद्योग गुजरातला नेले. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे. कदाचित काही दिवसात 400 पार होईल. गॅस, डिझेलचे दर किती किमतीवर पोहचले आहेत? गरीब देखील खुष नाही. गुजरातला क्रिकेटची फायनल का नेली? पुत्र प्रेमाचे आरोप आमच्यावर करता. पण हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि तो तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भाजपाला दिला.

- Advertisement -

दरम्यान, महाविकास आघाडी शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासभेला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार शंकरराव गडाख, सुनील शिंदे, लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष संदीप वरपे यांच्यासह शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. भव्य प्रचार सभेनंतर अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुका प्रशासकीय कार्यालय येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीचा सांगलीचा तिढा मिटणार; राऊत म्हणाले, विशाल पाटील आमचे…

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -