घरपालघरकचरा प्रकल्पाविरोधात आमदार प्रताप सरनाईक रस्त्यावर

कचरा प्रकल्पाविरोधात आमदार प्रताप सरनाईक रस्त्यावर

Subscribe

मिरा भाईंदरच्या मध्यवर्ती ठिकाणी इंद्रलोक परिसरात शाळा आणि खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर कचरा विकेंद्रीकरण प्रकल्पाविरोधात आमदार प्रताप सरनाईक यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

मिरा भाईंदरच्या मध्यवर्ती ठिकाणी इंद्रलोक परिसरात शाळा आणि खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर कचरा विकेंद्रीकरण प्रकल्पाविरोधात आमदार प्रताप सरनाईक यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. नागरी वस्तीत कचरा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी आमदार सरनाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला. भाईंदरमधील इंद्रलोक येथील भूखंड क्र. २१९ माध्यमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी आरक्षित आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदान व स्व. प्रमोद महाजन हॉलच्या बाजूला ही जागा आहे. त्या आरक्षित जागेवर महापालिकेच्यावतीने कचरा विकेंद्रीकरण प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यासाठीचा ठराव सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर संमत केला आहे. स्थानिक शिवसेना नगरसेवक आणि रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. आमदार सरनाईक यांनी रस्त्यावर उतरून कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. शाळेचे आरक्षण असताना आरक्षण बदलण्यासाठी ३७-१ अन्व्ये प्रशासनाच्या संमतीने प्रस्ताव महासभेत आणावा लागतो. त्यानंतर राज्य शासनाची मंजुरी व निविदा प्रक्रिया करावी लागते. मात्र तसे न करता जाणून-बुजून याठिकाणी कचरा प्रकल्पाबाबत राजकीय ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

आरक्षित जागेत कचरा प्रकल्प सुरु करण्याचा महासभेत मंजूर झालेला ठराव हा राजकीय ठराव आहे. त्याला महापालिका प्रशासनाची कोणतीही मान्यता नाही, असे सांगत आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रकल्पाविरोधात आपले मत नोंदवले आहे. शाळा आणि मैदानासाठी राखीव भूखंडावर कचरा प्रकल्प होणार नाही, असे आश्वासनही ढोले यांनी यावेळी दिले. या परिसरातील ७० हाऊंसिंग सोसायट्यांनी कचरा प्रकल्पाला आपला लेखी विरोध दर्शवला आहे. पक्षनेता नगरसेवक धनेश पाटील, नगरसेवकप्रविण पाटील, प्रवक्ते शैलेश पांडे, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर, उपजिल्हासंघटक निशा नार्वेकर, नगरसेवक तारा घरत, जयंतीलाल पाटील, स्नेहा पांडे, अनंत शिर्के, पूजा आमगावकर, विभागप्रमुख अमित मोरे, उपशहरप्रमुख विकास पाटील, अस्तिक म्हात्रे, उपविभागप्रमुख विष्णू कदम, मनोज दिक्षित, शाखाप्रमुख सरदार आमते, अजय नाईक, संजय मोरे, विभागसंघटक अंकिता सावंत, अस्मिता परुळेकर, पवन घरत, संकेत गुरव, आकांक्षा वीरकर यांनीही आंदोलनात भाग घेतला होता.

- Advertisement -

हेही वाचा –

Dr Suvarna Waje : धक्कादायक! डॉ. सुवर्णा वाजेंचा पतीनेच कट रचून केला घात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -