घरपालघरमोगरा फुलाचा भाव गडगडला; उत्पादक शेतकरी अडचणीत

मोगरा फुलाचा भाव गडगडला; उत्पादक शेतकरी अडचणीत

Subscribe

जव्हार तालुक्यात ग्रामीण भागातील शेतरकऱ्यांना फुलशेती लागवडीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न यायला सुरुवात झाल्याने जीवनमान उंचावण्यास मदत व्हायला लागली होती.

जव्हार तालुक्यात ग्रामीण भागातील शेतरकऱ्यांना फुलशेती लागवडीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न यायला सुरुवात झाल्याने जीवनमान उंचावण्यास मदत व्हायला लागली होती. परंतु आता मोगरा फुलाचा भाव गडगडल्याने ४०० रुपये प्रति किलोने मिळत आहे. त्यामुळे हवामानात बदल, औषधे, खतांचे दर आणि वाहतूक खर्च वाढल्याने मजुरी व खर्च वसूल होत नसल्याने मोगरा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. पालघर जिल्ह्यात वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू, मोखाडा, तलासरी, पालघर, वसई या तालुक्यात मोगऱ्याची लागवड केली जाते. जिल्ह्यात मोगरा उत्पन्न प्रति हेक्टरी ३.२ टन येते. तर ३६७.० लागवडी क्षेत्र हेक्टर आहे, अशी माहिती पालघर जिल्हा कृषी कार्यालयातून देण्यात आली आहे. जिल्ह्यात भातशेतीला जोड धंदा म्हणून गावठी कुक्कूटपालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय केले जातात. फळबाग, वेलवर्गीय भाजीपाला, सुर्य फुलाची लागवड करून नगदी पिकांची लागवड केली जाते. या लागवडी बरोबरच येथील शेतकरी हा मोगऱ्याची लागवड करून आहे.

मोगरा फुले विक्रीत कोरोना काळापासून मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तालुक्यातील मोगरा उत्पादन अधिक असून चांगल्या दर्जाची फुले असतानाही सोयीनुसार बाजारपेठ गाठता येत नसल्याने बाजारभाव कोसळत आहे.
– तुळशीराम तऱ्हाड, मोगरा उत्पादक, शेतकरी

- Advertisement -

या मोगरा लागवडीकडे ग्रामीण भागातील तरुण शेतकरी वर्ग लक्ष केंद्रीत करुन उदरनिवाहाचे साधन बनवले आहे. मोगरा उत्पादक शेतकरी भल्या पहाटे उठून तो बसने ठाणे गाठत पुढे ट्रेनने मुंबईच्या बाजापेठेत जातो. तेथे त्याला ठरलेल्या बाजार भावात त्या मोगरा फुलाला किंमत मिळते. यावर दिनचर्या चालविणाऱ्या होतकरू तरुणाला हवामानातील बदलाने मोगरा पिकांवर पांढरी माशी, करपा, मुरडा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

मोगरा पिकासाठी लागणारी किटकनाशके औषधांच्या किंमती वाढल्या आहेत. खतांच्या किंमतीबरोबर पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने वाहतुक खर्च वाढला आहे. त्यामुळे मोगरा उत्पादक शेतकऱ्यांचा हा उत्पादन खर्च वाढल्याने त्यांचा नफा कमी झाला आहे. बाजारात मोगरा फुलाला प्रति किलो ३४० रुपये ते ४०० रुपये भाव मिळत आहे. या अगोदर हिवाळा ऋतूत मोगरा पिकाला ७८० ते ९८० रुपये भाव मिळत होता. हिवाळ्यामध्ये मोगरा उत्पादकता कमी असल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो. तर उन्हाळ्यात मोगऱ्याची उत्पादकता वाढल्याने मोगरा पिकाला कमी भाव मिळतो. यावेळी उत्पादकतेत वाढ आणि वातारणातील बदल रोगाच्या प्रादुर्भावाने मोगरा पिकाची शेती अडचणीत सापडली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईतील नाले सफाईच्या कामाची होणार पोलखोल, साॅफ्टवेअर ठेवणार कामांवर लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -