घरपालघरहवा प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामांना पालिकेकडून नोटिसा

हवा प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामांना पालिकेकडून नोटिसा

Subscribe

या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत महापालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह पर्यावरण विभाग व नगररचना आणि अतिक्रमण यांनी एकत्रितपणे काम करत हवा प्रदूषण होण्यापासून रोखण्याचे आवाहन त्यांच्या समोर उभे राहिले आहे.

भाईंदर :- मिरा- भाईंदरमधील नवीन बांधकामाच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणासाठी आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी मिरा-भाईंदर  महापालिकेने प्रत्यक्षरित्या करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी नेमलेल्या विशेष पथकांकडून पाहणी सुरू असून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्यास काम थांबविणे किंवा ते सील करण्यात येणार आहे. तसेच सर्वात जास्त हवा प्रदूषित करणारे रेडिमिक्स काँक्रीट प्लँट (आर.एम.सी.) यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकीकडे महापालिका प्रदूषण कमी करणाऱ्यावर भर देत असतानाच दुसरीकडे  वातावरणातील बदलांमुळे मुंबई सह मिरा- भाईंदरच्या हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत महापालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह पर्यावरण विभाग व नगररचना आणि अतिक्रमण यांनी एकत्रितपणे काम करत हवा प्रदूषण होण्यापासून रोखण्याचे आवाहन त्यांच्या समोर उभे राहिले आहे.
खास उपाययोजना
शासनाच्या ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा’ च्या उपक्रमा अंतर्गत महापालिकेने शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातील निधीमधून व “राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम” अंतर्गत २ “डस्ट कंट्रोल यंत्र मशीन” घेण्यात आल्या आहेत. याचा वापर करून झाडे, रस्त्यावरील धूळ, रस्त्यावरील ऑईल व झाडांवरील धूळ व हवेतील धूळ पाण्याचा फवारा मारून आटोक्यात आणली जात आहे.
मिरा- भाईंदर शहर हे मुंबई शहरालगत असलेले आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेले एक स्मार्ट शहर म्हणून नावारूपास येत आहे. शहरात नवे विविध बांधकाम विकास प्रकल्प, औद्योगिक प्रकल्पांमुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेवर त्याचा नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. त्यात पालिकेने शहरातील चौक व रहदारी आणि जात वाहने याठिकाणी त्या मशीनचा वापर करून यंत्रणाद्वारे धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी सातत्याने पाण्याचा फवारा करून धूलिकण कमी करण्यात मदत होत आहे. दुभाजकांवरील झाडांना पाणी देणे तसेच त्यावर जमा झालेले धूलिकण, फुटपाथवरील झाडांवर जमा झालेले धूलिकण कमी करणे, उंच झाडांना स्वच्छ ठेवण्यासाठी उपयोग पालिका करत आहे.
● नवीन बांधकामाच्या ठिकाणी उपाय व खबरदारी
७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्र्याचे आच्छादन नसणे, एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभवती किमान ३५ फूट आणि एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी, पत्र्यांचे आच्छादन किंवा कापडांचे आच्छादन असावे, बांधकामांना हिरवे कापड झाकून बंदिस्त करणे, बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असावी, बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असावेत आदी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्याने ही नोटीस बजावली आहे. २५ ऑक्टोबरला परिपत्रक जारी झाल्यापासून १५ दिवसांच्या आत स्प्रिंकलर्स आणि एका महिन्याच्या आत स्मॉग गन खरेदी करावे, असेही नोटिशीत नमूद आहे.
प्रतिक्रिया,
शहरातील रेडी मिक्स प्लँट धारकांना या आणि नवनिर्माणाधीन बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न झाल्यास कठोर कारवाई होणार असून त्यासाठी विशेष पथकाकडून शहरात तपासणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला बांधकाम व आरएमसी प्लांट व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना नोटीसीद्वारे केल्या जात आहेत. त्याचे पालन न केल्यास त्यांच्यावर उचित कारवाई करून त्याला स्थगिती आदेश काढणार आहोत.
–  संजय शिंदे, पर्यावरण विभाग, उपायुक्त
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -