Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर पालघर अद्याप शाखा अभियंत्यांवर कारवाई नाही

अद्याप शाखा अभियंत्यांवर कारवाई नाही

सरावली ग्रामपंचायतीची विकास कामे मर्जीतल्या ठेकेदारालाच देऊन मनमानी करणाऱ्या शाखा अभियंत्यावर कारवाई करून त्याची बदली करण्याची मागणी सरपंच, उपसरपंचांसह १७ सदस्याने केली होती.

Related Story

- Advertisement -

सरावली ग्रामपंचायतीची विकास कामे मर्जीतल्या ठेकेदारालाच देऊन मनमानी करणाऱ्या शाखा अभियंत्यावर कारवाई करून त्याची बदली करण्याची मागणी सरपंच, उपसरपंचांसह १७ सदस्याने केली होती. मात्र, मागणी लेखी नसल्याने कारवाई करता येत नाही, असे सांगत पालघर पंचायत समितीने शाखा अभियंत्याला पाठिशी घालण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. शाखा अभियंता एस. आर. जाधव आपल्या मर्जितील ठेकेदारांनाच कामे मिळावीत यासाठी ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. त्यांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी सामुहिक राजीनामे देण्यासाठी सरपंच आणि उपसरपंचांसह १७ सदस्यांनी २० मे २१ रोजी गटविकास अधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती.

शाखा अभियंत्यांविरोधात कोणतीही लेखी तक्रार करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही.
– हेमंत भोईर, प्रभारी उपभियांता, जिल्हा परिषद-पंचायत समिती, पालघर

- Advertisement -

गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी उपअभियंता हेमंत भोईर यांना प्रत्यक्ष भेटून सदस्यांनी तक्रार केली होती. त्यावेळी शाखा अभियंत्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जगताप यांनी दिले होते. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रभाकर राऊळ यांनी ताबडतोब कारवाई झाली नाही, तर सर्व सदस्य सामुहिक राजीनामे देऊन ग्रामपंचायत बरखास्त करतील, असा इशारा दिला होता.

ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या त्या अभियंत्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही. लेखी तक्रार करण्यात आलेली आहे.
– प्रभाकर राउळ, जिल्हा समन्वयक, शिवसेना

- Advertisement -

मात्र, जाधव यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी लेखी मागणी न केल्याने कारवाई करता येत नाही, अशी भूमिका पंचायत समितीने घेऊन जाधव यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. याची माहिती मिळताच आता जाधव यांच्याविरोधात लेखी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आतातरी कारवाई करणार की नाही, असा प्रश्न सदस्यांनी विचारला आहे.

प्रशासनाकडून शाखा अभियंत्याला प्रशासन वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी असून तसा ठराव करून तक्रार करण्यात आलेली आहे.
– लक्ष्मी चांदणे, सरपंच, ग्रामपंचायत, सरावली

कोणत्या ठेकेदाराने काम करावे हे शाखा अभियंता ठरवत असल्याची सदस्यांची तक्रार आहे. मर्जीत नसलेल्या ठेकेदारांच्या कामावर जाधव नेहमी आक्षेप घेत असतात. त्या ठेकेदारांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना हकनाक त्रास दिला जातो. मात्र, मर्जीतील ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम जाधव करत असल्याची तक्रार केली जात आहे.

हेही वाचा –

असंघटित कामगार, आदिवासींना प्रतिबंधक लस उपलब्ध करून घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

- Advertisement -