घरपालघरनिसर्ग ओरबाडणार्‍यांना आता नो एन्ट्री

निसर्ग ओरबाडणार्‍यांना आता नो एन्ट्री

Subscribe

महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या आता ५२ होणार आहे. त्या माध्यमातून राज्यात याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

पालघर:राज्यशासनाच्या वन विभागामार्फत पालघर जिल्ह्यात २४८.३८ चौरस मिटर क्षेत्रावर तीन नवीन वनसंवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये जव्हार, धामणी, आणि अशेरी गड अशा तीन ठिकाणांना संवर्धन राखीव करण्यात आल्याचे मुख्यमंत्री व राज्याचे वनमंत्री यांनी जाहीर केले. यामुळे या क्षेत्रातील वन्य प्राणी तसेच वनांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या आता ५२ होणार आहे. त्या माध्यमातून राज्यात याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

पालघर जिल्ह्यात संवर्धनासाठी २४८.३८ किलोमीटर क्षेत्र राखीव केल्यामुळे या जिल्ह्यातील वनसंपत्ती तसेच वन्यजीव यांना संरक्षण मिळणार असून पर्यटन व अन्य गोष्टीसाठी त्याचा फायदा जिल्ह्याला होणार आहे. जिल्ह्यातील अशा स्वरूपाच्या संवर्धनासाठी आणखी काही क्षेत्राचे गरज असल्याचे पर्यटकांकडून बोलले जात आहे. शासनाने लोकांच्या ,पर्यटकांच्या या मागणीचा विचार करावा अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

चौकट:
मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य वन्यजीव मंडळाची १९ वी बैठक झाली, यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वन विभागाचे तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात १८ नवीन संवर्धन क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार ११८.२८ चौरस किलोमीटर, धामणी ४९.१५ चौरस किलोमीटर तर अशेरी गड ८०.९५ चौरस किलोमीटर संवर्धित वनक्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -