घरपालघरभाईंदरमध्ये कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन

भाईंदरमध्ये कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन

Subscribe

शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध लावणी सादर केली जाणार आहे.

भाईंदर :- कोल्हापूर जिल्हा रहिवाशी विकास मंडळ आणि मीरा-भाईंदर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर येथे १६, १७ व १८ फेब्रुवारी रोजी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर पूर्व येथे कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन केले आहे. कोल्हापूर महोत्सवामध्ये जगात प्रसिद्ध असलेला कोल्हापूरचा तांबडा व पांढरा रस्सा, कोल्हापूरची मिसळ, कोल्हापूरची चप्पल, कोल्हापुरी गुळ, कोल्हापुरी साज असे अनेक प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. शिवाय मनोरंजनासाठी तिनही दिवस संगीतमय कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध लावणी सादर केली जाणार आहे.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे महालक्ष्मी, ज्योतिबा आणि बाळूमामा यांचे आकर्षक मंदिर उभारण्यात येणार आहे. तसेच सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार असे अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच सिने कलाकार उपस्थित राहणार आहेत. मीरा-भाईंदरकरांनी कोल्हापूर महोत्सवात उपस्थित राहून आस्वाद घेण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा रहिवाशी विकास मंडळाचे संस्थापक विजय पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -