घरपालघरडहाणू नगरपरिषद मार्फत पावसाळा पूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात

डहाणू नगरपरिषद मार्फत पावसाळा पूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात

Subscribe

यामध्ये सर्वप्रथम शहरात साचणार्‍या पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा व्हावा यासाठी सांडपाणी वाहून नेणारी गटारे आणि नाल्यांची सफाई करण्याचे काम सुरू आहे.

डहाणू: येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डहाणू नगरपरिषद क्षेत्रात नालेसफाई, पाणी स्वच्छता, रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी व इतर उपाययोजनांची तयारी सुरू आहे. पावसाळ्यात शहरात पाणी साचून पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी विशेष काळजी नगरपरिषद मार्फत घेण्यात येत आहे. डहाणू नगरपरिषदेमार्फत पावसाळ्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सर्वप्रथम शहरात साचणार्‍या पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा व्हावा यासाठी सांडपाणी वाहून नेणारी गटारे आणि नाल्यांची सफाई करण्याचे काम सुरू आहे.

त्याचबरोबर गटारांमध्ये डासांची पैदास रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. शहरातील 90 टक्के गटार सफाईचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात काम पूर्ण होणार आहे. मल्याण पश्चिम रेल्वे लाईन ते धनानी नाला, मसोली मेनरोड गटार, लोणीपाडा येथील बि.एस.ई.एस. कम्युनिटी हॉल जवळील गटार, मसोली प्रभुपाडा नाला, सरावली चिकू खरेदी विक्री केंद्रा कडे जाणारा नाला, कब्रस्तान समोरील गटार, मुर्गीवाला ते संजयनगर नाला इत्यादी मुख्य ठिकाणची कामे पूर्ण झाली असून उर्वरीत गटार सफाईचे काम सात ते आठ दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून मिळाली आहे.

- Advertisement -

येत्या पावसाळ्याच्या दृष्टीने नगरपरिषद मार्फत उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण आणि नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. या आठवड्यात सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. पावसाळ्यात देखील काही अडचणी निर्माण झाल्यास नगरपरिषद स्तरावरून त्या सोडवण्यात येतील.
– वैभव आवारे, मुख्याधिकारी, डहाणू नगरपरिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -