घरपालघरमान्सूनपूर्व कामे अंतिम टप्प्यात

मान्सूनपूर्व कामे अंतिम टप्प्यात

Subscribe

यासाठी मोखाडा महावितरण कर्मचार्‍यांकडून गाव पाड्यांना जोडणार्‍या विद्युत वाहिनीला अडसर ठरणार्‍या झाडाच्या फांद्या छाटणे, वाकलेले पोल, जुने ट्रान्स्फॉर्मर, नादुरुस्त लाईन दुरुस्त करण्याची मान्सूनपुर्व कामे सुरू आहेत.

मोखाडा: मोखाडा तालुक्यातील गाव पाड्ये डोंगर दरी, जंगलात विखुरलेले असल्याने या गाव पाड्यांना वीज पुरवठा करणारी लाईन देखील जंगल, डोंगर दरी खोर्‍यातून गेलेली आहे.यामुळे पावसाळ्यात या गाव पाड्यातील नागरिकांना विद्युत वाहिनीवर बिघाड होऊन विजेचा लपंडाव सहन करावा लागतो.पावसाळा काळात वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी मोखाडा महावितरण कर्मचार्‍यांकडून गाव पाड्यांना जोडणार्‍या विद्युत वाहिनीला अडसर ठरणार्‍या झाडाच्या फांद्या छाटणे, वाकलेले पोल, जुने ट्रान्स्फॉर्मर, नादुरुस्त लाईन दुरुस्त करण्याची मान्सूनपुर्व कामे सुरू आहेत.

महावितरणची संपूर्ण यंत्रणा मोकळ्या वातावरणात असल्याने वादळी वारे, पाऊस याचा सर्वांत मोठा फटका महावितरणला बसतो.गाव पाड्यांना जोडणार्‍या विद्युत वाहिनीवर झाडांची एखादी फांदी पडली किंवा वादळी वार्‍याने पोल वाकले तर संपूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा खंडित होतो.त्यामुळे कोलमडलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कर्मचार्‍यांना भरपावसात परिश्रम घ्यावे लागतात.गेल्या काही वर्षांतील आपत्तींचे अनुभव लक्षात घेता महावितरणने यंदा याबाबत विशेष दक्षता घेत पावसाळ्यापूर्वी विद्युत उपकेंद्र, विजेचे खांब, वीजवाहिन्या, रोहित्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली आहे.अर्थिंग तपासणी, लाइटनिंग अरेस्टर तपासणी व आवश्यक असल्यास बदलणे, नादुरुस्त आयसोलेटर अलाइनमेंट तपासणे, बॅटरीची स्थिती तपासून खराब कपॅसिटर बदलणे, रोटरी स्विच तपासणीची कामे करण्यात येऊन नादुरुस्त यंत्रणा दुरुस्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असून ती सर्व कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. तर पावसाळ्यात ऐनवेळी दुरुस्तीचे साहित्य अपुरे पडू नये यासाठी आवश्यक साहित्याचा साठा सुध्दा करुन ठेवला जात आहे.तसेच महावितरणच्या सर्व वीज कर्मचार्‍यांना पावसाळ्यात उद्भवणार्‍या समस्यांबाबत सूचना देण्यात आलेल्या असल्याचे मोखाडा उप कार्यकारी अभियंता मनोहर जाधव यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -