घरपालघरनैसर्गिक वायू पुरवठा कमतरतेने इंधन विना वाहन चालकांची फरपट

नैसर्गिक वायू पुरवठा कमतरतेने इंधन विना वाहन चालकांची फरपट

Subscribe

सीएनजी फिलिंग स्टेशनची संख्या वाढल्याने मालवाहतूक करणारे टेम्पो, खासगी कार आणि प्रवाशी वाहतूक करणार्‍य रिक्षांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

मनोर : पालघर तालुक्यातील पाच आणि वसई तालुक्यातील तीन मिळून आठ सीएनजी फिलिंग स्टेशनवर नैसर्गिक वायूच्या पुरवठा कमतरतेमुळे फिलिंग स्टेशनवर इंधनावर धावणार्‍या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. चार ते पाच किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्याने वाहनचालकांची गैरसोय निर्माण झाली आहे. बोईसर रेल्वे स्थानकालगत समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या निर्मितीत अडथळा ठरत असलेली नैसर्गिक वायू पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन हटवण्याच्या कामासाठी गेल इंडियाकडून आठवडा भराच्या कालावधीसाठी नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद करण्यात आला आहे.दुरुस्तीच्या कामासाठी नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद केल्याने सीएनजी फिलींग स्टेशनला होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद झाला आहे.
गेल इंडिया कंपनीकडून गुजरात गॅस कंपनीला आणि गुजरात गॅस कंपनीकडून पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. सीएनजी इंधनावर धावणार्‍या वाहनांना गॅस पुरवठा करण्यासाठी गुजरात गॅसकंपनी कडून पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएजी फिलिंग स्टेशनवर उभारण्यात आले आहेत. डीझल आणि पेट्रोल महाग झाल्याने इंधन खर्च कमी येणार्‍या सीएनजी इंधनावर धावणार्‍या वाहनांचा वापर वाढला आहे. सीएनजी फिलिंग स्टेशनची संख्या वाढल्याने मालवाहतूक करणारे टेम्पो, खासगी कार आणि प्रवाशी वाहतूक करणार्‍य रिक्षांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

गेल इंडिया कंपनीकडून आठवडा भराचा शट डाऊन घेण्यात आला असला तरीही पाइपलाइन हटवण्याच्या कामाला त्यापेक्षा अधिक वेळ लागणार असल्याने पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक वायूचा पुरवठा बाधित होणार आहे. त्यामुळे सीएनजी इंधनावर धावणार्‍या वाहन चालकांचा गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. नैसर्गिक वायूचा पुरवठा बाधित झाल्याने सीएनजी उपलब्ध असलेल्या फिलींग स्टेशनवर सीएनजी इंधनावर धावणार्‍या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या रांगेमुळे गॅस भरण्यासाठी चार ते पाच तासांच्या वाट पाहावी लागत असल्याने वाहनचालकांची गैरसोय निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -