घरपालघरमिरा भाईंदरमध्ये सोळा इमारती अतिधोकादायक

मिरा भाईंदरमध्ये सोळा इमारती अतिधोकादायक

Subscribe

मिरा-भाईंदर शहरात पावसाळ्यात धोकादायक इमारती पडून दुर्घटना घडतात. यामध्ये अनेक नागरिकांचे नुकसान होते. या दुर्घटना घडू नये, यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मिरा-भाईंदर शहरात पावसाळ्यात धोकादायक इमारती पडून दुर्घटना घडतात. यामध्ये अनेक नागरिकांचे नुकसान होते. या दुर्घटना घडू नये, यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहा प्रभाग समितीमधील इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये ४ गट तयार करण्यात आले असून यामध्ये शहरात १६ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करून त्या पाडून टाकण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शहरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतीचा अहवाल तयार करून डागडुजी करणे किंवा खाली करून रहिवाशांची सुरक्षितता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिकेने ३० वर्षे जुन्या इमारतीची संरचनात्मक तपासणी (ऑडिट रिपोर्ट) करण्यासाठी पालिका आयुक्त यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते. या अहवालामध्ये ३० वर्ष जुन्या इमारतीची संरचनात्मक तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार दरवर्षी प्रभाग अधिकारी ३० वर्षे जुन्या इमारतींना संरचनात्मक तपासणी करून इमारत सुस्थितीत असल्याचा अहवाल पालिकेकडे सादर करण्याबाबतचे नोटीसा बजावतात. परंतु त्या इमारतधारक गांभीर्याने घेत नाहीत, तपासणी करत नाहीत. अशा प्रकारचा अहवाल सादर करणाऱ्या इमारतींची संख्या अत्यल्प आहे.

शहरात धोकादायक व अतिधोकादायक इमारती यांची वर्गवारीनुसार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार धोकादायक इमारतींची देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तर अतिधोकादायक इमारती पावसाळ्यात होणाऱ्या सुरक्षेच्या दृष्टीने ३१ मे पूर्वी त्या खाली करून तोडक कारवाई करण्यात येणार आहे.
– मारुती गायकवाड, उपायुक्त अतिक्रमण विभाग

- Advertisement -

पालिकेने ३० वर्षे जुन्या इमारतींना संरचनात्मक तपासणी करणे बंधनकारक केले आहे. या सर्वेक्षणात इमारतीची चार गटात वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये गट सी १-१६ धोकादायक इमारती, गट सी २ अ-१४ इमारती खाली करून दुरुस्ती करणे, गट सी २ ब-२८९ इमारती खाली न करता दुरुस्ती करणे, सी ३-१३ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे, असे गट तयार केले आहेत. यामध्ये गट सी १-१६ इमारती, गट सी २ अ-१४ इमारती, गट सी २ ब-२८९ इमारती, सी ३-१३ इमारती या इमारती घोषित करण्यात आल्या आहेत. त्या अहवालानुसार महापालिकेच्या प्रभाग क्र. १ मध्ये २ इमारती व प्रभाग दोनमध्ये ४ इमारती, प्रभाग तीनमध्ये २ इमारती, प्रभाग ४ मध्ये ३ इमारती, प्रभाग ५ मध्ये एकही धोकादायक इमारत नाही. तर प्रभाग ६ मध्ये ५ इमारती धोकादायक आहेत. या धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करून पाडून टाकण्याचे आदेश प्रभाग अधिकार्‍यांना दिले आहेत.

- Advertisement -

तीस वर्ष जुन्या इमारतीची संरचनात्मक तपासणी (ऑडिट रिपोर्ट) करून पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अगोदर तसा अहवाल ज्या त्या प्रभागातील प्रभाग अधिकाऱ्याकडे सादर करण्याचे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले आहेत.

हेही वाचा –

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सडीज बेबी, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -