घरपालघरउपनिरीक्षक तारगे, मुंढे प्रकरणाची चौकशी पूर्ण; कारवाईची प्रतिक्षा

उपनिरीक्षक तारगे, मुंढे प्रकरणाची चौकशी पूर्ण; कारवाईची प्रतिक्षा

Subscribe

आदिवासींची लुटमार केल्याचे उजेडात आल्यानंतर मोखाडा पोलीस ठाण्यातील दोन वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकांची खातेनिहाय चौकशी पूर्ण झाली असून त्या अहवालावर आता पोलीस अधिक्षक कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आदिवासींची लुटमार केल्याचे उजेडात आल्यानंतर मोखाडा पोलीस ठाण्यातील दोन वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकांची खातेनिहाय चौकशी पूर्ण झाली असून त्या अहवालावर आता पोलीस अधिक्षक कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पोलीस अधिकार्‍यांचे प्रताप उजेडात आल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ आता मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे आणि मंगेश मुंढेंच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने मोखाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी स्वतः तारगे यांनी लुटमारीची कबुली देत १ लाख ९५ हजार रपये संबंधितांना परत केले होते. तसेच उरलेले ३३ हजार रुपये नंतर देण्याचे आश्वासन देऊन झाल्याप्रकाराबद्दल जाहिर माफी मागीतली होती. पोलिसांची बेअब्रु करणारा हा प्रकार उजेडात आल्यानंतर पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तारगे आणि मुंढे यांची मोखाडा पोलीस ठाण्यातून बदली केली होती. तसेच दोघांचीही खातेनिहाय चौकशीही सुरु केली होती.

विभागीय चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर वरिष्ठांकडूनच कार्यवाही होईल.
– के. एल. हेगाजे, चौकशी अधिकारी

- Advertisement -

आर्थिक गुन्हे शाखेचे के. एस. हेगाजे यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हेगाजे यांनी मोखाडा परिसरात जाऊन चौकशी करून आपला अहवाल पोलीस अधिक्षकांना सादर केला आहे. हा अहवाल गोपनीय असल्याने यात नेमके काय दडले आहे. याचा खुलासा पोलीस अधिक्षक शिंदे कोणती कारवाई करतात त्यातूनच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्यातरी तारगे आणि मुंढे यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा मोखाडा तालुक्यात रंगली आहे.
दरम्यान, तारगे आणि मुंढे यांची उचलबांगडी केल्यानंतर आता मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी पोलीस निरीक्षक संजय ब्राम्हणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी मोखाडा पोलीस ठाण्याचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे असायचा. पण, उपनिरीक्षकांचे प्रताप उजेडात आल्यानंतर पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्ती करण्यात आला आहे.

(ज्ञानेश्वर पालवे – हे मोखाडाचे वार्ताहर आहेत)

- Advertisement -

हेही वाचा –

स्वतःमध्ये बदल करा नाहीतर मला बदल करावा लागेल, पंतप्रधान मोदींची खासदारांना तंबी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -