घरपालघरकपासे ते सफाळे रस्ता सुरुच राहणार; पर्यायी रस्ता तयार करण्याचे आदेश

कपासे ते सफाळे रस्ता सुरुच राहणार; पर्यायी रस्ता तयार करण्याचे आदेश

Subscribe

जेएनपीटी ते दिल्ली या डेडिकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्पांतर्गत पश्चिम रेल्वेवरील पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील कपासे येथील पुलाचे तोडक कामामुळे रस्ता बंद केल्याने स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार होते.

जेएनपीटी ते दिल्ली या डेडिकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्पांतर्गत पश्चिम रेल्वेवरील पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील कपासे येथील पुलाचे तोडक कामामुळे रस्ता बंद केल्याने स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार होते. यासंदर्भात आपलं महानगरमध्ये ‘कपासे सफाळे मार्ग बंद करण्याचा घाट’ या मथळ्याखाली २१ फेब्रुवारीच्या अंकात बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल लोकप्रतिनिधींनी घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांसह डीएफसीसी आदीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याने सद्यस्थितीत कपासे पुलावरील मार्ग पूर्ववत सुरू राहणार आहे.

प्रशासनाने मनाई केल्याने तूर्तास याठिकाणी मंगळवार, २२ फेब्रुवारीपासून करण्यात येणारे खोदकाम व तोडकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्यातरी याच पुलावरून वाहतूक सुरू राहणार आहे. जेएनपीटी ते दिल्ली या डेडिकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्पांतर्गत पश्चिम रेल्वेवरील जिल्ह्यातील सफाळे ते बोईसर रेल्वे स्थानका दरम्यानच्या राज्य महामार्गावरील कपासे उड्डाणपूलाजवळ नव्याने दुसऱ्या उड्डाणपूल उभारणीसाठी वाहतुकीचा मुख्य रस्ता डीएफसीसीमार्फत मंगळवारपासून बंद करण्यात येणार असल्याने १८ ते २० गावातील नागरिकांना ६ किमीचा वळसा घालून माकणे रेल्वेच्या फाटकातून जावे लागणार होते. डीएफसीसीने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून नंतरच जुन्या पुलाला हात लावणे अपेक्षित होते.

- Advertisement -

तालुक्यातील कपासे येथील जागा ग्रामसभेच्या ठरावानुसार नाहरकत दाखला देताना अटी व शर्तींचे पालन न झाल्यास हा ग्रामसभेचा नाहरकत दाखला रद्द समजण्यात येईल. या अटीनुसार ठराव घेण्यात आला होता. परंतु डीएफसीसीने या अटींचे पालन न करता राज्य महामार्ग असणारा कपासे ते सफाळे दरम्यानचा कपासे उड्डाण पुलावरील रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच व नागरिकांनी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत रस्ता बंद करण्याचा व पुलाचे तोडकाम करण्यास मज्जाव करत डीएफसीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, माजी मंत्री मनीषा निमकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शहा, शिवसेना जिल्हा समनव्यक अनुप पाटील, माकूणसार सरपंच अमोल मोहिते, कपासे माजी उपसरपंच बिपीन पाटील आणि संदीप पाटील आदी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, व डीएफसीचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली.

जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी पालघरचे महसूल उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व डीएफसी प्रकल्पाचे अधिकारी यांची संयुक्त समिती नेमली असून या समितीच्या अहवालानंतर त्या बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

(नवीन पाटील – हे सफाळे येथील वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

युद्धाचे ढग! रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले; आता अमेरिका, पाश्चात्य देशांची भूमिका काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -