घरपालघरपारंपरिक अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर

पारंपरिक अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर

Subscribe

शेती व्यवसायात नांगरणी, चिखलणी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले लाकडी नांगर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कालबाह्य झाले आहेत.

वाडा:  भातशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यातील शेतकरी आपल्या पारंपरिक भातशेतीला छेद देत त्यांनी आधुनिकतेची कास धरल्याने पारंपरिक लाकडी शेती अवजारांचा वापर करण्यास बंद केले आहे. कमी वेळात व कमी खर्चात उपलब्ध होत असलेल्या आधुनिक अवजारांमुळे शेतकरी पुन्हा भातशेती व्यवसायाकडे आकर्षित झाला आहे. या पुर्वी केल्या जाणार्‍या पारंपरिक शेती व्यवसायात लाकडी नांगर, लाकडी बैलगाडी, अन्नधान्य साठविण्यासाठी बांबुचे कणगे, सुप, टोपली आदी लाकडी साहित्यांचा वापर केला जात होता. मात्र जंगलांचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शेतीसाठी लागणारे पशुधनही कमी झाल्याने व शेतकर्‍यांनी आधुनिकतेची कास धरल्याने लाकडी अवजारे कालबाह्य ठरली आहेत. शेती व्यवसायात नांगरणी, चिखलणी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले लाकडी नांगर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कालबाह्य झाले आहेत.

जव्हार, मोखाडा या तालुक्यातील डोंगर तसेच चढ-उतार असलेल्या जमिनीवर नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर चालविणे शक्य होत नसल्याने या जमिनीची मशागत करण्यासाठी आजही लाकडी नांगराचा वापर केला जात असताना दिसून येतो, मात्र हे प्रमाण अगदी नगण्य आहे.
त्यामुळे शेती अवजारे बनविणारे बारा बलुतेदार शेतीची लाकडी अवजारे कालबाह्य झाल्याने अडचणीत सापडले आहेत.
शेतीमधील आधुनिकीकरणामुळे बारा बलुतेदारांच्या व्यवसायाला अवकळा लागली आहे.

- Advertisement -

कोट
1) सर्वच क्षेत्रात आधुनिकीकरणाचा वापर वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनीही नवनवीन अवजारांचा वापर करणे काळाची गरज होऊ लागली आहे.
– भगवान सांबरे – शेतकरी, झडपोली, ता. विक्रमगड.

2) आधुनिकीकरणामुळे वेळ, खर्च याची तर बचत होतेच, पण उत्पादनातही मोठी वाढ होत आहे.

- Advertisement -

– अनिल पाटील – कृषि भुषण शेतकरी, सांगे, ता. वाडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -