घरपालघरपाणीटंचाईमुळे विरारकर त्रस्त; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

पाणीटंचाईमुळे विरारकर त्रस्त; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

वसई विरार महापालिकेकडून विरारच्या मनवेलपाडा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

वसई विरार महापालिकेकडून विरारच्या मनवेलपाडा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तोही अनियमित आणि कमी दाबाने होत असल्याने येथील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याभागात नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा महापालिकेला घेराव घातला जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपशहर प्रमुख उदय जाधव यांनी दिला आहे. विरार पूर्वेकडील मनवलेपाडा गाव, कारगील नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, टेपाचा पाडा, गणेश चौक परिसराची लोकसंख्या वीस हजारांच्या घरात आहे. याभागात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तीन ते चार दिवसआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही अनियमित आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी टंचाईचे संकट आले आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून याभागातील पाणी पुरवठा नियमित आणि मुबलक करण्यात यावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

अन्यथा महापालिकेला घेराव घातला जाईल, इशारा त्यांनी दिला आहे. या परिसरात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करून दोन टाक्या बांधण्याची घोषणा केली होती. पण, त्या टाक्या अद्याप बांधल्या न गेल्याने येथील पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याकडेही त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

दरम्यान, सध्या वसई विरार परिसरात एकदिवस आड पाणी पुरवठा केला जातो. वसईकरांना दर महिन्याला फक्त पंधरा दिवसच पाणी पुरवठा केला जात असताना पाणी पट्टी मात्र पूर्ण महिन्याची आकारली जात असल्याचीही जाधव यांची तक्रार आहे. त्याचबरोबर वसईत अनधिकृत नळजोडण्यांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून पाणीपट्टी भरणार्‍यांना मुबलक पाणी मिळेनासे झाले आहे. या अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती करून सर्वेक्षण करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा –

पालिकेतील ५ हजार कर्मचार्‍यांना वेतन आयोग लागू; फरकाबाबत संभ्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -