लग्नापासून-रिसेप्शन पार्टीपर्यंत सगळीकडे होतेय अक्षया-हार्दिकच्या लूकची चर्चा

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी झाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. दरम्यान, काल (2 डिसेंबर) अक्षया आणि हार्दिक विवाह बंधनात अडकले. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित अक्षया-हार्दिक यांचा पुण्यामध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. यावेळी अक्षयाने लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती. तर हार्दिकने कुर्ता आणि धोतर घातले होते. या लूकमध्ये दोघेही शाही अंदाजात दिसत आहेत. संध्याकाळी झालेल्या रिसेप्शन पार्टीतील अक्षया-हार्दिकच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.रिसेप्शन पार्टीमध्ये अक्षयाने जांभळ्या रंगाचा सुंदर घागरा परिधान केला आहे. तर हार्दिकने देखील त्याच रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.