कतरिनाचं डिझायनर साडीतील सुंदर फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या ‘फोन भूत’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त कतरिना तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. कतरिना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावरुन कतरिना तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करत असते. नुकतेच कतरिनाने साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कतरिनाने सुंदर डिझायनर साडी परिधान केली आहे. शिवाय हे कतरिनाचे हे फोटो जोधपूर उम्मेद भवन पॅलेसमधील आहेत. याचं ठिकाणी कतरिना आणि विक्कीचं लग्न देखील झालं होतं.