Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: मुंबईकरांना प्रत्यक्ष पाहता ब्रिटीश कालीन 'ट्राम'

Photo: मुंबईकरांना प्रत्यक्ष पाहता ब्रिटीश कालीन ‘ट्राम’

मुंबईत देश, विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना व मुंबईकरांना आता या ट्रामला प्रत्यक्ष जवळून पाहता येणार आहे.

Related Story

- Advertisement -

ब्रिटिश कालीन ट्राम आता मुंबईकरांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे. लोकप्रतिनिधीच्या मागणीनंतर बेस्टने कोलकत्ता येथून एका ट्रामचे अवशेष मुंबईत आणले. त्यावर १६ लाख रुपये खर्चून व त्याची डागडुजी करून ही ट्राम पुढे सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या भाटिया गार्डनमध्ये दर्शनीय ठिकाणी ठेवण्यात आली. ट्रामला महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. मुंबईसह देशावर बरीच वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजवटीत मुंबईत जलद वाहतुकीचे साधन म्हणून अगोदर घोड्याला जोडलेली ट्राम मुंबईत धावली. नंतर विजेवरील ट्राम धावली होती. आता मुंबईत देश, विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना व मुंबईकरांना आता या ट्रामला प्रत्यक्ष जवळून पाहता येणार आहे.

 

- Advertisement -

- Advertisement -