घरताज्या घडामोडीमुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके : गृहमंत्री, मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके : गृहमंत्री, मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

प्रसिद्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने आज संध्याकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती दुपारी ३ वाजता कंट्रोल रूमला आल्यानंतर या परिसरात संपुर्णपणे वाहतूक रोखून धरण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाण तपास यंत्रणा घटनास्थळी पोहचल्या. या घटनेत मुंबई पोलिसांनी सर्वात प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. महत्वाचे म्हणजे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारमध्ये स्फोटकांसोबतच एक पत्रही सापडले आहे. मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात अशाच प्रकारचे पत्र काही दिवसांपूर्वी आल्याची माहिती समोर आली आहे. (Explosive found outside Mukesh Ambani house, Mumbai police and Home minister gave their first reaction)

explosive

- Advertisement -

काय म्हणाले गृहमंत्री ?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घराबाहेर एक स्कॉर्पिओ कार आढळली आहे. या संपुर्ण प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात जे काही सत्य आहे, ते लवकरात लवकर समोर येईल अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 

- Advertisement -

लवकरच यामागील सत्य उघड होईल – अनिल देशमुख

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडली स्फोटकांनी भरलेली गाडी; लवकरच यामागील सत्य उघड होईल – अनिल देशमुख

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, February 25, 2021

मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई पोलिसांनी अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक संशयास्पद गाडी ही गावदेवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापडली आहे. दक्षिण मुंबईत कार्मायकल रोडवर ही बेवारस गाडी सापडली आहे. मुंबई पोलिसांची तसेच आणखी टीम घटनास्थळी पोहचल्या आहेत. तपासादरम्यान गाडीत काही जिलेटीनच्या काड्या सापडल्या आहेत. पण ही स्फोटके कोणत्याही उपकाराणाला जोडली गेलेली नव्हती असेही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील आणखी तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया हाऊस बाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी गुरूवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांना आढळली आहे. घटनास्थळी मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक पथकही दाखल झाले असून या गाडीची तपासणी करण्यात आली. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक विभागाची टीमदेखील याठिकाणी हजेरी झाल्याची माहिती आहे. सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील हेदेखील घटनास्थळी पोहचले असल्याचे कळते. या स्कॉर्पिओ गाडीमध्ये २५ जिलेटीनच्या कांड्या सापडल्याचे कळते.  मुकेश अंबानींच्या घराबाहेरच जिलेटीनच्या स्फोटकांनी भरलेला साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे ही मुंबई पोलिसांनी ही कार टो करून पुढे नेऊन या गाडीची तपासणी केली आहे.

बुधवारपासूनच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी होती अशी माहिती. ही बाब संशयास्पद आढळल्याने तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली. त्यावेळी प्रथमदर्शनी या गाडीमध्ये स्फोटके आढळल्याचे कळते. अंबानीच्या ताफ्यातील सुरक्षेच्या कारपैकीच एक नंबर हा स्कॉर्पिओला वापरण्यात आला आहे. अंबानींच्या सुरक्षेतील टीमने स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घातपाताच्या उद्देशानेच ही गाडी याठिकाणी ठेवली असल्याचे कळते. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. या गाडीमध्ये अंबानीच्या नावे एक धमकीचे पत्रही सापडले असल्याचे कळते. याआधीच मुकेश अंबानी यांच्या नरीमन पॉईंट येथील कार्यालयात धमकीचे पत्र आले होते. त्यानंतरच मुकेश अंबानी यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. राज्याचे गृह विभागाचे राज्यमंत्री शंभू राजे देसाई यांनीही घटनास्थळाहून माहिती घेतली आहे. त्यांनीही या प्रकरणातील मुळाशी कोण आहे याचा शोध घेऊ असेही त्यांनी सांगितले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -