घरताज्या घडामोडीSchool Reopen | PHOTO | अन् शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट

School Reopen | PHOTO | अन् शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली शाळा आज 24 जानेवारीला पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्यामुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीनुसार, बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सुरू झाल्या आहेत. आज पुन्हा बऱ्याच कालावधीनंतर शाळांमध्ये किलबिलाट सुरु झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली शाळा आज 24 जानेवारीला पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्यामुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीनुसार, बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सुरू झाल्या आहेत. आज पुन्हा बऱ्याच कालावधीनंतर शाळांमध्ये किलबिलाट सुरु झाला आहे. ‘जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटते त्या पालकांनीच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये, त्यांनी घेऊ नये,’ असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. मात्र मुंबईतील अनेक शाळांची घंटा वाजली आहे. पाहा, दादर येथील साने गुरुजी विद्यालयामधील पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्याचे फोटो. (छाया : राजेश वराडकर )


हे ही वाचा – आजपासून शाळेची घंटा वाजणार, मात्र विद्यार्थ्यांना सक्ती नाही

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -