चैत्यभूमी येथे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनर्वाण दिनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. मुंबई महापालिकेतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित छायाचित्र प्रदर्शनास यावेळी मान्यवरांनी भेट दिली. तसेच मान्यवरांनी भिमज्योती चे दर्शन घेतले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दाखल झाले.
राज्यपालांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती.
यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
तसेच यावेळी मान्यवरांनी भिमज्योती चे दर्शन घेतले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुयायींना संबोधित केले.
मुंबई महापालिकेतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित छायाचित्र प्रदर्शनास यावेळी मान्यवरांनी भेट दिली.