स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह, हेल्पेज इंडियाचा स्तुत्य उपक्रम

भारताला स्वातंत्र्य मिळून यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव ठिकठिकाणी साजरा होत आहे. अनेक  संस्था, कार्यालयात अमृत महोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. अशाच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या हेल्पेज इंडिया आणि समन्वय या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.