भारतातील ‘या’ 5 मंदिरांमध्ये श्रीकृष्णांचा आहे साक्षात वास; एकदा तरी नक्की भेट द्या

हिंदू धर्मातील भगवान श्रीकृष्णांना अत्यंत पूजनीय मानले जाते. पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्ण हे विष्णू देवतेचा ८ वा अवतार आहेत. श्रीकृष्णांची गोपाळ, कन्हैया, केशव, वासुदेव, किशोर अशी अनेक नावं आहेत. भारतामध्ये श्रीकृष्णांची अनेक मंदिरं असून प्रत्येक मंदिराची वेगळी खासियत देखील आहे.