रायगडमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्या, एकात शस्त्रास्त्र सापडल्याची माहिती

महाड : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन संशयास्पद बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापैकी एका बोटीत शस्त्रास्त्रे सापडली तर अन्य एक लहान बोट आढळली. त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळले आहे. पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे माहिती दिली नसली तरी, रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आढळलेली ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत या बोटीमध्ये दोन – तीन एके-47 रायफल आणि रायफलच्या बुलेट्स आढळल्याची माहिती मिळत आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळले. वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या रायगड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच..)