घरताज्या घडामोडीPali : ग्रामस्थांची अंत्यविधीसाठी वणवण ; नवीन स्मशानभूमी असून नसल्यासारखीच!

Pali : ग्रामस्थांची अंत्यविधीसाठी वणवण ; नवीन स्मशानभूमी असून नसल्यासारखीच!

Subscribe

रस्त्याची सुविधा निर्माण करण्याची मागणी

सुधागड तालुक्यातील वर्‍हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील दांड आदिवासीवाडीसाठी बांधण्यात आलेली नवी स्मशानभूमी रस्ता नसल्यामुळे असून नसल्यासारखी झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या आदिवासी वस्तीसाठी स्मशानभूमी नसल्याने कुणाचे निधन झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना वणवण करावा लागत होती. याबाबत प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरला होता. हा विषय आता निकाली निघाला खरा, परंतु ग्रामपंचायतीने २ लाख २२ हजार रुपये खर्च करून बांधलेल्या स्मशानभूमीकडे जाण्याकरिता मार्ग नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी न करता आजही दगडी रचून अंत्यविधी उरकावा लागत आहे. आधी लढा दिला तो स्मशानभूमीसाठी, आता लढा स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यासाठी, अशी विचित्र समस्या निर्माण झाली असून, ग्रामपंचायतीने रस्त्याची सुविधा निर्माण करण्याची मागणी होत आहे.

वाडीला स्मशानभूमी मिळावी याकरिता अनेक वेळा निवेदन देऊन संघर्ष करावा लागला आहे. आता नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता नाही. जोपर्यंत रस्ता केला जात नाही तोपर्यंत या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करणार नाही.
-शंकर पवार, ग्रामस्थ, दांड आदिवासीवाडी

- Advertisement -

हे ही वाचा – Dasara melava 2021 : मी पुन्हा येईन म्हणणारे आता बसले आहेत – मुख्यमंत्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -