घरमहाराष्ट्रनाशिकसप्तश्रुंग गडावर फडकला किर्तीध्वज, भाविकांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

सप्तश्रुंग गडावर फडकला किर्तीध्वज, भाविकांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

Subscribe

नांदुरी गावातून गडाच्या पहिल्या पायरीपर्यंत वाजत गाजत जल्लोषात निघाली मिरवणूक

श्री सप्तश्रृंगी देवी मंदिरावर नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी अर्थात काल मध्यरात्री कीर्ती ध्वज मोठ्या दिमाखात फडकावण्यात आला. कोरोना नियमांमुळे अत्यंत कमी भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याला प्रारंभ झाला.

१० फूट लांब काठीवर फडकणारा ११ मीटर केशरी ध्वज घेऊन दरेगावातल्या गवळी परिवाराने अत्यंत अवघड मार्गाने थेट माथ्यावर जाऊन हा ध्वज फडकावला. तत्पूर्वी, नांदुरी गावातून गडाच्या पहिल्या पायरीपर्यंत वाजत गाजत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवसाच्या मध्यरात्री आणि नवमीच्या मध्यरात्री हा सोहळा रंगतो. विशेष म्हणजे शिखरावर जाण्यासाठी मार्ग नसतानादेखील मानकरी असलेला गवळी परिवार हे आव्हान अगदी सहजपणे पूर्ण करतो. देवीच्या आशीर्वादामुळेच हे शक्य होत असल्याची भाविकांची धारणा आहे. यंदा कोरोना निर्बंधांमुळे साधेपणाने मिरवणूक काढण्यात आली होती. काल सायंकाळी देवी चरणी नतमस्तक होत गवळी परिवार शिखराकडे रवाना झाला होता. हा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो, त्यामुळे काही भाविकांचीही यावेळी उपस्थिती होती.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -