घरफोटोगॅलरीPHOTO : IAS अधिकारी टीना डाबी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सोशल मीडियावर होतेय...

PHOTO : IAS अधिकारी टीना डाबी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

Subscribe

2016 च्या बॅचच्या टॉपर असलेल्या IAS अधिकारी टीना डाबी या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता त्या चर्चेत आल्या आहेत त्या एका कारवाईमुळे. टीना डाबी या राजस्थानमधील जैसलमेर येथील जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी हल्लीच केलेल्या एका कारवाईमध्ये पाकिस्तानातून भारतात आलेल्या रिफ्युजी असलेल्या हिंदुंची घरे उद्ध्वस्त केली आहेत. अमरसागर ग्रामपंचायत परिसरात पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदूंच्या तात्पुरत्या वसाहतींवर ‘अतिक्रमण’ मोहीम सुरू करत टीना डाबी यांनी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पण याचदरम्यान आता त्यांचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टीना डाबी या पहिल्यांदा त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आल्या होत्या. टीना यांचे पहिले लग्न 2018 मध्ये त्यांच्याच बॅचचा दुसरा टॉपर राहिलेल्या अतहर आमिरसोबत झाले होते. मात्र, काही कारणांमुळे हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. टीना आणि अतहर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये जयपूरमधील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करुन एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टीना यांनी 2022 मध्ये त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गवांडे या IAS अधिकाऱ्याशी लग्न केले.

2016 च्या बॅचच्या टॉपर असलेल्या IAS अधिकारी टीना डाबी या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
टीना यांचे पहिले लग्न 2018 मध्ये त्यांच्याच बॅचच्या दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर राहिलेले अतहर आमिरसोबत झाले होते. मात्र, काही कारणांमुळे हे नाते न टिकल्याने दोघांचा घटस्फोट झाला. पण या लग्नामुळे त्या पहिल्यांदा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
त्या कायमचं सोशल मीडियावर पोस्ट करत असतात, ज्याची नेहमी चर्चा करण्यात येते.
6 जुलै 2022 टीना यांनी जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी पदभार स्विकारला.
त्यानंतर टीना या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
टीना यांनी 2022 मध्ये त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या IAS अधिकारी प्रदीप गवांडे यांच्याशी लग्न केले.
पण आता अमरसागर ग्रामपंचायत परिसरात पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदूंच्या तात्पुरत्या वसाहतींवर ‘अतिक्रमण’ मोहीम सुरू करत टीना डाबी यांनी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
टीना डाबी या पहिल्यांदा त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आल्या होत्या. आणि आता तीने पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदूंच्या घरावर कारवाई केल्याने वादामध्ये सापडल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -