Photo : स्वरा भास्करचे पाकिस्तानी लेहंग्यातील सुंदर फोटो पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. महिन्याभरापूर्वी कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वरा आणी फहादने गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थित धुमधडाक्यात लग्न केलं. यावेळी त्यांनी मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न, रिसेप्शन हे सगळे कार्यक्रम अगदी साग्रसंगीत केले. दरम्यान, त्यानंतर स्वरा आणि फहादने परिधान केले पाकिस्तानी ड्रेस देखील चांगलेच चर्चेत आले.