सोनाक्षी सिन्हाचा ब्रायडल लूक चर्चेत

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोनाक्षीचा डबल एक्सएल चित्रपट प्रदर्शित झाला होता. सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते. नुकतंच सोनाक्षीने एक सुंदर ब्रायडल फोटोशूट केलंय. ज्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे.