घरताज्या घडामोडीRamesh Deo Death: अभिनयातील 'देव' काळाच्या पडद्याआड, तीन दिवसांपूर्वीच साजरा केला...

Ramesh Deo Death: अभिनयातील ‘देव’ काळाच्या पडद्याआड, तीन दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस

Subscribe

रमेश देव यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार, राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनयातील देव म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड गेले. (Ramesh Deo Death)  रमेश देव यांचे बुधवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन. वयाच्या ९३व्या वर्षी रमेश देव यांची धीरुभाई अंबानी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. तीन दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी त्यांचा ९३वा वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने देव यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. रमेश देव यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार, राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पाहा रमेश देव यांचा थोडक्यात जीवनप्रवास ( फोटो – गूगल आणि सोशल मीडियावरुन साभार )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -