घरराजकारणChhagan Bhujbal : ...म्हणून सरकार स्थापनेबाबत चर्चा करूनही पवारांनी माघार घेतली; भुजबळांचा...

Chhagan Bhujbal : …म्हणून सरकार स्थापनेबाबत चर्चा करूनही पवारांनी माघार घेतली; भुजबळांचा मोठा आरोप

Subscribe

शरद पवार यांनी पक्ष बांधणीसाठी येवल्यातून महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी त्यांनी अजित पवार आणि छगन भजुबळ यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. यानंतर छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी सरकार स्थापनेबाबत चर्चा करूनही माघार का घेतली यावर भाष्य केले आहे.

Chhagan Bhujbal : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) 8 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnvis Government) मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडले आहेत. यानंतर शरद पवार यांनी पक्ष बांधणीसाठी येवल्यातून महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी त्यांनी अजित पवार आणि छगन भजुबळ यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. यानंतर छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी सरकार स्थापनेबाबत चर्चा करूनही माघार का घेतली यावर भाष्य केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, 2014 मध्ये भाजपने शिवसेनेला सोडलं. तेव्हा शरद पवार यांनी भाजपला सांगितलं होतं की, तुम्ही शिवसेना सोडली की आम्ही काँग्रेसला सोडू. त्यानंतर काही महिन्यांनी आम्ही तुमच्यासोबत सरकारमध्ये येऊ. तसेच राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. मात्र यानंतर शरद पवार यांनी आमचा पाठिंबा गृहित धरू नका असे भाजपला सांगितले. त्यामुळे फडणवीस यांनी शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केले, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

शरद पवार यांनी शिवसेनेला बाहेर काढण्यास सांगितले
सत्तास्थापनेबाबत भाजपासोबत झालेल्या चर्चेवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार आणि पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी भाजपासोबत चर्चा केली. त्या चर्चेत मी नव्हतो. प्रफुल्ल पटेल वगैरे ही मंडळीच चर्चा करत होती. 2017मध्ये शरद पवार यांनी भाजपाशी युतीची चर्चा करून माघार घेतली, याबाबत अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. या चर्चा झाल्या तेव्हा मी तुरुंगात होतो. उद्योगपतीच्या घरी पाच दिवस चर्चा झाली, तसेच कोणाला कोणती खाते मिळणार याबाबतही ठराव झाला. मात्र सरकारमध्ये शिवसेना नको, असा आग्रह शरद पवार यांनी धरला होता. तसेच पवारांकडून शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. 2014 मध्येही शिवसेनेला बाहेर काढण्यास सांगण्यात आले होते, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे. ते म्हणाले की, शिवसेना 25 वर्षापासूनचा भाजपाचा मित्र पक्ष असल्यामुळे त्यांनी नकार दिला.
…म्हणून भाजपाने शिवसेनेला सोडलं
छगन भुजबळ दावा करताना म्हणाले की, 2019मध्येही शरद पवार यांनी युतीसंदर्भात मोदींची भेट घेतली होती. युतीचं ठरवून निवडणुकीनंतर भाजपाशी तडजोड करण्याचे ठरले होते. त्यानंतर अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात वाद झाला. तेव्हा आम्ही शिवसेनेला सोडतो आहोत तुम्ही सोबत येणार ना? अशी विचारणा भाजपाने केली. तेव्हा होकार मिळाल्यानंतर भाजपाने शिवसेनेला सोडलं. या सर्व चर्चेत मी कुठेच नव्हतो. मला शरद पवार यांनी कधीच कोणत्याही चर्चेत पाठवलं नाही. त्यांनीच सर्व केलं, तरीही मला दोष का देतात? असा प्रश्न भुजबळ यांच्याकडून विचारण्यात आला आहे.
येवल्यात माझ्यावर राग काढण्याचं कारण काय?
छगन भुजबळ म्हणाले की, बडोद्याला युतीसंदर्भात भाजपासोबत बैठकीचं ठरलं. तेव्हा जयंत पाटील बैठकीला जाताना शरद पवार यांना सांगायला आले, तेव्हा पवार यांनी जाऊ नको सांगत 2019 ला भाजपासोबत सरकार करण्याचे अजित पवार यांच्यासमोर सांगितले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शरद पवार यांनी अचानक घुमजाव केला. हा सर्व प्रकार मला माहितचं नव्हात. तरीही येवल्यात येऊन माझ्यावर राग काढण्याचं कारण काय? उलट मी सर्व ठिकाणी लढत होतो, असेही भुजबळ म्हणाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -