घररायगडजिल्ह्यातील सात मतदारसंघात २२,७६,०३१ मतदार; पनवेलमध्ये सर्वाधिक ५ लाख ४० हजार १७०...

जिल्ह्यातील सात मतदारसंघात २२,७६,०३१ मतदार; पनवेलमध्ये सर्वाधिक ५ लाख ४० हजार १७० मतदार

Subscribe

रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या जिल्हा प्रशासनाने केली जाहीर केली असून जिल्ह्यातील एकूण सात विधानसभा मतदारसंघातील एकूण पुरुष मतदार संख्या ११ लाख ६० हजार ५१९, स्त्री मतदार संख्या ११ लाख १५ हजार ४६७, तृतीयपंथी -४५, एकूण मतदार संख्या २२ लाख ७६ हजार ३१ इतकीआहे. राज्यातील १८८क्रमांकाच्या पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असून तेथे एकूण मतदार संख्या ५ लाख ४० हजार १७० इतकी आहे.

अलिबाग: रायगड TEAजिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या जिल्हा प्रशासनाने केली जाहीर केली असून जिल्ह्यातील एकूण सात विधानसभा मतदारसंघातील एकूण पुरुष मतदार संख्या ११ लाख ६० हजार ५१९, स्त्री मतदार संख्या ११ लाख १५ हजार ४६७, तृतीयपंथी -४५, एकूण मतदार संख्या २२ लाख ७६ हजार ३१ इतकीआहे. राज्यातील १८८क्रमांकाच्या पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असून तेथे एकूण मतदार संख्या ५ लाख ४० हजार १७० इतकी आहे. त्यात पुरुष मतदार संख्या २ लाख ९० हजार २६०, स्त्री मतदार संख्या २ लाख ४९ हजार ८७८, तृतीयपंथी-३२ अशी मतदारसंख्या आहे.
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीत मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष पुन:रिक्षण कार्यक्रम घोषित केल्यानंतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठका घेऊन मतदार नोंदणी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी पाठपुरावा करून मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
मतदारसंघ क्रमांक    मतदारसंघ       पुरुष मतदार           स्त्री मतदार              तृतीयपंथी      एकूण मतदार
१८९                    कर्जत         १ लाख ५०हजार ४९२   १ लाख ४७ हजार २१३       १          २ लाख ९७ हजार ७०६
१९०                    उरण          १ लाख ५१ हजार ०४९   १ लाख ४८ हजार ४५२,     ७       २ लाख ९९ हजार ५०८

१९१                    पेण            १ लाख ५३ हजार १११      १ लाख ४८ हजार ७४८    २        ३लाख १ हजार ८६१

- Advertisement -

१९२                 अलिबाग         १ लाख ४४ हजार ६५४      १ लाख ४६ हजार ३२९   ०     २लाख ९० हजार ९८३

१९३                 श्रीवर्धन           १ लाख २९ हजार ५०५      १ लाख ३३ हजार ९८२    १    २ लाख ६३ हजार ४८८.

- Advertisement -

१९४                  महाड           १ लाख ४१ हजार ४४८      १ लाख ४० हजार ८६५    २    २ लाख ८२ हजार ३१५
 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -