थंडीच्या हुडहुडीमुळे मुरूड बनले महाबळेश्वर

थंडीचा जोर वाढला असून दिवसभर अंगात थंडी राहात असल्याने नागरिकांकडून स्वेटर व मफलरचा वापर वाढला आहे. तसेच हे वातावरण शेतीला व रब्बीतील वाल, कलिंगड,मका आदिसह पिकांसाठी लाभदायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Exif_JPEG_420

मुरुड तालुक्यात गेले काही दिवस पारा घसरला आहे. हवामानात बदल होऊन गार वारे वाहू लागले आहेत. या गार वा-यामुळे दिवसा ढवळ्या थंडीचा जोर पाहायला मिळत आहे.या थंडीच्या हुडहुडीमुळेमुरूड बनलं महाबळेश्वर अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहे. सध्या तालुक्यातील सरासरी किमान तापमान १६ अंश सेल्सिअस आहे. हे तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

थंडीचा जोर वाढला असून दिवसभर अंगात थंडी राहात असल्याने नागरिकांकडून स्वेटर व मफलरचा वापर वाढला आहे. तसेच हे वातावरण शेतीला व रब्बीतील वाल, कलिंगड,मका आदिसह पिकांसाठी लाभदायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. थंडीचा जोर वाढल्याने तालुक्यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. अनेक गावांमध्ये थंडीमुळे रस्त्यावर सकाळी उशीरापर्यंत सामसूम दिसत आहे.

थंडीच्या बचावासाठी नागरिक ठिक-ठिकाणी शेकोट्या करताना पहावयास मिळत आहे.वयोवृद्ध घराबाहेर पडताना दिसत नाही. थंडीचा जोर आणखी वाढणार थंडीची तीव्रता वाढल्याने आता स्वेटर, स्कार्फ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. मुरुड शहरातील दत्तवाडीतील नागरिक शेकोटी पेटून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत.