घररायगड‘मिल बंद’मुळे कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड

‘मिल बंद’मुळे कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड

Subscribe

महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन झाल्यापासून खालापूर तालुक्यातील गल्लीतील कार्यकर्ते सुध्दा मुख्यमंत्र्यांच्या नावाने कारखान्यांना धमकावण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू झाली असून याचा परिणाम एक कंपनी बंद करण्यापर्यंत पोहचला असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेला अमोल पेपर मिल हा कारखाना नुकताच बंद करण्यात आल्याने या कारखान्यात गेली २५ ते ३० वर्ष काम करणारे ५० कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे

खोपोली: महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन झाल्यापासून खालापूर तालुक्यातील गल्लीतील कार्यकर्ते सुध्दा मुख्यमंत्र्यांच्या नावाने कारखान्यांना धमकावण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू झाली असून याचा परिणाम एक कंपनी बंद करण्यापर्यंत पोहचला असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेला अमोल पेपर मिल हा कारखाना नुकताच बंद करण्यात आल्याने या कारखान्यात गेली २५ ते ३० वर्ष काम करणारे ५० कामगारांवर मोठे संकट कोसळले आहे.या कारखान्यात प्लास्टिक पेपर बसला जात होता.या कारखान्याला गेले काही दिवस विशिष्ट राजकीय पक्षांच्या स्वयंघोषित नेत्याने त्रास द्यायला सुरुवात केली होती.स्वत:ला मोठा नेता समजणार्‍या या नेत्याने कंपनीतील खराब पाणी बाहेर टाकण्यास मज्जाव करीत केलेली सौदेबाजी कंपनीच्या मालकाला परवडण्यासारखी नसल्याने अखेर कंपनी मालकाने कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.याला कामगारांनी दुजोरा दिला असून आमच्या भरल्या पोटावर लाथ मारणार्‍याला परमेश्वर क्षमा करणार नसल्याचा टाहो हे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय करीत आहेत.

कामगारांचे कुटुंब आर्थिक संकटात
खालापूर तालुक्यातील अमोल पेपर मिल कंपनी ही गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे.कामगारांना वेळेवर पगार देणारी कंपनी म्हणून या कंपनीचे नाव सर्वदूर आहे.कंपनीत स्थानिक अशिक्षित कामगारांना सामावून घेतल्याने अनेक संसार सुखाचा आनंद घेत होते. या कामगारांना दिवाळीला दोन पगार बोनस दिला जात होता. त्याच प्रमाणे एखाद्याच्या कुटुंबावर नैसर्गिक प्रसंग ओढावल्यास कारखाना मालक सर्वतोपरी मदत करीत असे,सर्वच कामगारांना साधारण २५ हजारांच्या आसपास पगार होता आणि त्यांचा पगार हा दर महिन्याच्या ठरलेल्या तारखेलाच होत असे त्यामुळे कामगार आनंद होते.या सर्व कामगारांना कारखाना बंद करण्यात आल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisement -

स्थानिक नेत्याच्या त्रासाला कंटाळून निर्णय?
या कारखान्याला मिळालेली जागा तशी थोडीच असल्याने वापरलेल्या पाण्यापैकी खराब झालेले पाणी हा कारखाना टँकरद्वारे बाहेर टाकत असे; त्या पाण्याला विरोध करीत स्थानिक स्वयंघोषित नेत्याने आपणास काही मिळते का ? यासाठी कंपनीला नाहक त्रास द्यायला सुरुवात केल्याचे समजते.त्यांचा यामागील उद्देश कोणता होता हे कामगारांना न समजण्या इतपत कामगार अडाणी नाहीत.अखेर त्यांच्या त्रासाला कंटाळून कंपनी मालकाने कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला.

कामगारांची कंपनीवरोधात तक्रार नाही
कंपनी बंद करतांना शासकीय नियमानुसार कामगारांना जो काही मोबदला द्यावा लागतो तो मोबदला कामगारांना कंपनीकडून मिळणार असल्याचे व्यवस्थापकांकडून कामगारांना सांगण्यात आले आहे.कामगारांचे कंपनी किंवा मालिकाबद्दल कोणतीच तक्रार नाही, मात्र ज्या नेत्याने स्वतःची पोळी भाजण्यासाठी हा प्रकार केला आहे, त्याला आम्ही सोडणार नाही अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -