सुपारी संघावर एकता परिवर्तन पॅनलचे वर्चस्व; करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल असलेली मुरुडमधील संस्था

करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल असणारा तालुक्यातील नामांकित मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकता परिवर्तन पॅनलचेे वर्चस्व सिध्द झाले आहे. या पॅनेलचे सर्वाधिक उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून कार्यतत्पर पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे.दोन्ही गटाकडून सदरची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती.

मुरुड: करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल असणारा तालुक्यातील नामांकित मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकता परिवर्तन पॅनलचेे वर्चस्व सिध्द झाले आहे. या पॅनेलचे सर्वाधिक उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून कार्यतत्पर पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे.दोन्ही गटाकडून सदरची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. सुनियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराची जबाबदारी घेऊन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर,शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सह चिटणीस मनोज भगत आणि सुधीर पाटील यांनी विजयश्री घेचून आणून सुपारी संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
विमुक्त भटक्या जाती व विशेष मागास वर्ग प्रजातीमधून विकास दिवेकर यांना ३९१ मते मिळाली तर नथुराम महाडिक याना ३४३ मते मिळाली जास्त मते असणारे दिवेकर यांना विजयी घोषित करण्यात आले.अनुसूचित जाती जमाती मधून डॉक्टर अमित बेनकर याना ३६९ मते मिळाली तर श्रीकांत नांदगावकर याना ३६७ मते मिळाली.प्रामाणिक कार्यतत्पर पॅनेलचे डॉक्टर बेनकर हे विजयी झाले आहेत.
सदरील निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी अतिक खतीब,सुभाष महाडिक,ऍड इस्माईल घोले,फैरोज घलटे,सुधीर पाटील,अजित कासार,तमीम ढाकम,विजय भोय,विजय पैर,ताबिश ढाकम ,रमेश चौलकर,प्रभाकर मसाल ,सुधीर माळी,प्रकाश विरकुड,संजय डांगे,नरेंद्र हेदुलकर,संतोष पाटील,बाबासाहेब अर्जबेगी,राहील कडू,हसमुख जैन,उमेश माळी,जावेद हदादि,प्रमिला माळी,ऍड.मृणाल खोत,मनीष माळी,मुजफ्फर सुर्वे,राजू पोतनीस इत्यादींनी परिवर्तन पॅनल विजयासाठी परिश्रम घेतले.

सहा सदस्य बिनविरोध आले निवडून
गेली अनेक वर्ष चेरमन पद भूषविलेले अविनाश (बाबा) दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक परिवर्तन पॅनेलने लढवली आणि जिंकूली आहे. सुपारी संघाच्या या निवडणुकीत अनेक दिग्ग्ज आपले नशीब अजमावत होते.प्रामाणिक पॅनलच्यावतीने मुरुड तालुका शिंदे गट शिवसेना प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर तसेच सुपारी संघाचे विद्यमान चेरमन महेश भगत, माजी नगरसेवक संजय गुंजाळ यांना पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत सहा सदस्य अगोदर बिनविरोध निवडून आले होते.

११ पैकी दहा सदस्य विजयी
११ सदस्य निवडून आणण्यासाठी दोन्ही गटांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. परंतु मतदारांनी सत्ताधारी प्रामाणिक आणि कार्यतत्पर पॅनलला धुडकावून एकता परिवर्तन पॅनेलला ११ पैकी दहा सदस्य निवडून देऊन पूर्ण बहुमत त्यांना बहाल केले आहे.त्यामुळे या निवडणुकीत विरोधक चारीमुंड्या चीत झाले आहेत.इतर मागास प्रवर्गातून प्रवीण चौलकर विरुद्ध विद्यमान चेरमन महेश भगत यांच्या सरळ लढत झाली यामध्ये चौलकर यांना ४२४ मते मिळाली तर भगत याना ३१४ मते मिळाली आहेत.चौलकर याना विजयी घोषित करण्यात आले आहे.

ईश्वर चिठीद्वारे निकाल
शहरातून सात उमेदवार निवडून द्यावयाचे होते, ते परिवर्तन पॅनल चे निवडून आले आहेत.शहरातून दांडेकर,अविनाश भगत,जनार्दन कंधारे,अमोल उपाध्ये ,विनोद भगत,प्रकाश रणदिवे,हिफाजू रहेमान दर्जी हे विजयी झाले आहेत.दर्जी आणि गुंजाळ याना समसमान मते मिळाली होती.त्यावर सहाय्य्क निंबंधक श्रीकांत पाटील यांनी ईश्वर चिठीद्वारे दोघांच्या चिठ्या टाकल्या होत्या त्यामधून दर्जी यांचे नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
=================