Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर रायगड जिल्ह्याचा रोजगार हमीचा आराखडा ४५२ कोटींचा 

जिल्ह्याचा रोजगार हमीचा आराखडा ४५२ कोटींचा 

Subscribe

एकेकाळी हाताला काम आणि पोटासाठी दाम अशी ओळख असणार्‍या रोजगार हमी योजनेचे स्वरूप आता बदलेले आहे. पूर्वी रोजगार हमीतून केवळ रस्ते तयार करणे, वृक्ष लागवड, उन्हाळ्यात डोंगरात विविध चर घेणे यासह ठराविक कामे घेण्यात येत होती. मात्र, रोजगार हमी योजनेतील कामांची संख्या वाढली असून याचा परिणाम योजनेतून होणार्‍या खर्चावरही झाला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचा वार्षिक नियोजन आराखडा ४५२ कोटी १८ लाख ६४ हजारांचा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींमध्ये ५६ हजार ५१ कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.

अलिबाग: एकेकाळी हाताला काम आणि पोटासाठी दाम अशी ओळख असणार्‍या रोजगार हमी योजनेचे स्वरूप आता बदलेले आहे. पूर्वी रोजगार हमीतून केवळ रस्ते तयार करणे, वृक्ष लागवड, उन्हाळ्यात डोंगरात विविध चर घेणे यासह ठराविक कामे घेण्यात येत होती. मात्र, रोजगार हमी योजनेतील कामांची संख्या वाढली असून याचा परिणाम योजनेतून होणार्‍या खर्चावरही झाला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचा वार्षिक नियोजन आराखडा ४५२ कोटी १८ लाख ६४ हजारांचा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींमध्ये ५६ हजार ५१ कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात १५ तालुके असून यातील अपवाद वगळा तर उर्वरित तालुक्यात रोजगार हमीच्या कामांना मोठी मागणी असते. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींमध्ये या विभागाने ऑनलाईन जॉबकार्ड अन्य काही ऑनलाईन सुविधा मतजूरांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पूर्वी रजिस्टरवर मजूरांची उपस्थिती आणि हातावर मिळणारी मजूरी देखील आता मजूरांच्या थेट बँक खात्यात जमा होतांना दिसत आहे. याचा परिणाम रोजगार हमी योजनेच्या खर्चावर होत असून वाढलेला खर्च हा कुशल आणि अकुशल कामाच्या रूपाने संबंधीत मजूरांच्या पदरात पडतांना दिसत आहे. रायगड जिल्ह्यात २०२२ – २३ मध्ये रायगड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत कुशल आणि अकुशल कामांवर १४२ कोटी ५२ लाखांचा खर्च झाला आहे.
रोह्यात ‘अ’ वर्गात जलसंधारणविषयक सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, गॅबियन बंधारे, शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, सलग समतल चर, पाझर तलाव दुरूस्ती, जमीन सपाटीकरण, गाळ काढणे, वनीकरण, रस्ता दुतर्फा वृक्षारोपण, रोपवाटिका या कामांचा समावेश आहे. ‘ब’ वर्गात सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, शेततळे, फळबाग लागवड, रेशीम उत्पादन, बांधावरील वृक्ष, घरकूल, सामूहिक गोठे, मत्स्यपालन तर ‘क’ वर्गात शौचालय, रस्ता खडीकरण, मुरमीकरण, सिमेंट रस्ता, डांबर रस्ता, ग्रामसंघ इमारत, बाजार ओटा, स्मशानभूमी शेड, सार्वजनिक ठिकाणी सुशोभिकरण करण्यात येत आहेत. चालू वर्षी ‘ड’ वर्गात मोडणार्‍या नावीन्यपूर्ण योजनेत गुरांचा गोठा, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, नापेड कंपोस्ट, सार्वजनिक जागेवरील गोदाम, शाळा, अंगणवाडीकडे जाणारा रस्ता, खेळाचे मैदान, शालेय स्वयंपाकगृह, शालेय संरक्षक भिंत, अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामे होणार आहेत.

बॉक्स..
वार्षिक आराखड्यात ६५ कोटीचा निधी नियोजित
जिल्ह्यात असणार्‍या ८०६ ग्रामपंचायतींमधून विकासात्मक कामे करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायत यंत्रणा आणि इतर शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहे. यामध्ये या यंत्रणांच्या आधारे जिल्ह्यात रोजगार हमीची ५६ हजार ५१ कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत यंत्रणेकडून ५० हजार ८५ तर इतर शासकीय यंत्रणांकडून ५ हजार ९६६ विकास कामे जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत यंत्रणेकडून करण्यात येणार्‍या कामांसाठी अंदाजित ३८७ कोटी १४ लाख ६७ हजार रुपयांचा निधी नियोजित करण्यात आला आहे. इतर शासकीय यंत्रणांकडून करण्यात येणार्‍या कामांसाठी अंदाजित ६५ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा निधी वार्षिक आराखड्यामध्ये नियोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -