Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे भिवंडीत सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न

भिवंडीत सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न

Subscribe

पारंपरिक रुढींना फाटा

‘लग्न’ ही प्रत्येकाच्याच जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट. पण त्याचबरोबर अनेक चुकीच्या प्रथा, कालबाह्य ठरलेल्या रूढी आणि त्यातून होणारे शोषण यांना जणू खतपाणी घालण्याचे कामच या विवाह संस्कृतीने बळकट केल्याने जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटोळे यांनी आपले कनिष्ठ चिरंजीव पियुष आणि विनोद रसाळ यांची कन्या साक्षी यांचा विवाह लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांना आदर्श मानत भिवंडीत सत्यशोधक पद्धतीने पार पाडला.यावेळी लग्न मंडपात वधू आणि वराचे आगमण होताच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन आणि वंदन करून सत्यशोधक विवाह विधीच्या कार्याला सुरवात करण्यात आली.

पुणे येथील ज्येष्ठ विचारवंत रमेश राक्षे यांनी या सोहळ्याचा विधी केला. जि.प.शाळा मुख्याध्यापक आनंद पुंड यांनी सुमधुर आवाजात पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी स्वरचित व महात्मा फुलेंनी रचलेली मंगलाष्टके म्हटली. वधू-वरांच्या डोक्यावर अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यांना भार्या आणि भ्रतार म्हणून कबूल करत असल्याची विधीकर्त्याकडून शपथ देण्यात आली.यावेळी राज्य उत्पादन शुल्क आय विभाग मुंबई शहर निरीक्षक आनंद पवार, नवी मुंबई महानगरपालिका स्थापत्य अभियंता आत्माराम काळे, अभियंता निलेश इंगोले, मातंग समाजाचे जेष्ठ नेते शाहूराज साठे, औसा येथील जि. प. शाळा मुख्याध्यापक आनंद पुंड, ठाणे मनपा शिक्षण मंडळ रात्रशाळा मुख्याध्यापक अ‍ॅड. अजित गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आनंद सोळसे, पत्रकार राजू काऊतकर, या मान्यवरांसह शेकडो समाजबांधव नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना असे आमचे संविधान हे पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व लग्न मंडपाच्या बाहेर कल्याण येथील पुस्तक विक्रेते सोमनाथ भोसले यांच्या वतीने प्रबोधनात्मक पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले व त्यांची विक्री करण्यात आली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -